Tarun Bharat

डिचोली तालुक्मयात नवीन 4 कोरोना रूग्ण

Advertisements

प्रतिनिधी/ डिचोली

  डिचोली तालुक्मयात कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडतच असून तालुक्मयातील एकूण रूग्णांची संख्या आता 57 झाली आहे. साखळी भागात काल रवि. दि. 5 जुलै रोजी केवळ एक नवीन कोरोना सकारात्मक रूग्ण आढळून आला असून गोविंदनगर सर्वण येथे काल रविवारी 3 नवीन रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे तालुक्मयात4 नवीन रूग्णांची भर पडली आहे.

  कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या डिचोली तालुक्मयातील साखळी भागात सध्या रूग्ण वाढतच असले तरी आता थोडीफार परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी साखळीत एक रूग्ण आढळून आला होता. तर काल रविवारी एक रूग्ण सापडला आहे. त्यामुळे साखळीतील एकूण रूग्णसंख्या 46 झाली आहे. रविवारी आढळून आलेला रूग्ण हा देसाईनगर साखळी येथील असून त्याची दोन दिवसांपूर्वी स्वेब टेस्ट घेण्यात आली होती. तर शनिवारी व रविवारी घेण्यात आलेल्या स्वेब टेस्टचे सर्व अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यामुळे साखळी भागातील कोरोना संसंर्गाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

साखळी सरकारी इस्पीतळ व नगरपालिकेचे उत्कृष्ट कार्य

   साखळी सरकारी समाजिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या इस्पीतळाच्या देखरेख समितीच्या अध्यक्षा डॉ. सरोज देसाई यांच्या देखरेखीखाली या इस्पीतळतील सर्व डॉक्टर्स व सहकारी कर्मचारी वर्गाकडून जबाबदारीने कोवीड टेस्ट व सकारात्मक कोरोना रूग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱया लोकांची शोधाशोध व त्यांच्या चाचण्या घेणे. लोकांना जागृत करणे. यात उत्तम कामगिरी बजावली आहे. त्याचप्रमाणे कोरोंआ बाधीत रूग्ण आढळलेल्या भागांमध्ये सेनिटाईझरची फवारणी मारणे व संपूर्ण भाग सेनिटाईझ करून घेणे या कार्यात साखळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष यशवंत माडकर व इतर नगरसेवक तसेच मुख्याधिकारी प्रवीणजय पंडित यांनीही योग्यरीत्या कामगिरी बजावली आहे. त्यामुळे साखळीतील परिस्थिती आटोक्मयात येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

      सर्वण भागातील रूग्णांच्या संख्येत वाढ.

   गोविंदनगर सर्वण डिचोली येथे यापूर्वी दोन रूग्ण आढळून आले होते. साखळीत दुकान असलेला एक इसम व त्याचा 5 वषीय मुलगा कोरोना सकारात्मक आढळून आला होता. मात्र आता या भागात एकदमच तीन कोरोना सकारात्मक रूग्ण सापडल्याने या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सदर रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्याचे काम सुरू असून लागलीच त्यांच्या स्वेब टेस्ट घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सर्वण भाग हा डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या आखत्यारीत येत असल्याने डिचोली आरोग्य केंद्राशी निगडित रूग्णांची संख्या 11 झाली आहे.

   देसाईनगर भागातील सर्व स्वेच्छा स्वेब चाचण्या नकारात्मक

देसाईनगर साखळी य भागात सर्वाधिक रूग्ण आढळल्यानंतर देसाईनगर युनिट या गटातर्फे साखळी सामाजिक आरोग्य कें?द्राच्या सहकार्याने देसाईनगर येथे कंटेनमेंट झोनच्या बाहेरील लोकांच्या स्वेब टेस्ट घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. सदर स्वेब चाचणी मोहिमेत देसाईनगरातील 115 लोकांच्या स्वेब टेस्ट घेण्यात आल्या होत्या. सदर सर्व स्वेब टेस्ट नकारात्मक आल्याने या भागातील लोकांनी सुस्कारा सोडला आहे. देसाईनगर येथे विशेष स्वेब टेस्टसाठी सहकार्य केल्याबद्दल देसाईनगर युनिट गटाने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे विशेष आभार मानले आहे.

Related Stories

राजकीय वादातून कळंगूट शिवजयंती रॅली रोखली

Amit Kulkarni

माजी मंत्री माँत क्रूझ यांचा दृष्टिकोन पुढे नेणार

Amit Kulkarni

पेडणे तालुका उपजिल्हाधिकाऱयांशी विर्नोडा पंचायत मंडळाची चर्चा

Omkar B

लोखंडी पाईपने नारळ काढण्याचा प्रयत्न अंगलट, वीजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, वास्कोतील घटना

Omkar B

संदीप परब बनले देवदूत..!

Amit Kulkarni

स्वातंत्र्यसैनिक गोपाळ चितारी यांचा आज सत्कार

Patil_p
error: Content is protected !!