Tarun Bharat

डिचोली तालुक्मयात शनिवारी 57 कोरोना रूग्ण सापडले

सांखळी/प्रतिनिधी :              

  डिचोली तालुक्मयातील सांखळी, मये आणि डिचोली मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून कोरोना, रूग्ण संख्येत वारंवार वाढ झालेली पाहायला मिळत आहे या पूर्वी तालुक्मयात कोरोना रूग्ण दगावले असल्याने या कोरोना रोगा विषयी भीतीचे वातावरण पसरले आहे तालुक्मयातील सोळाही गावात व डिचोली, सांखळी शहर परिसरात नागरिक विशेष काळजी घेताना दिसत आहे, डिचोली, सांखळी आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर नर्सेस, कर्मचारी वर्ग नागरिकांची विषेश काळजी घेऊन महामारी विषयीं सविस्तर माहिती देऊन रुग्णावरउपचार करताना दिसत आहे तर प्रकरण हाताबाहेर जाऊ नये याची सरकारी संबंधित अधिकारी लक्ष ठेऊन आहेत आज   डिचोली तालुक्मयात57 कोरोना बाधित नवीन रूग्ण सापडले 61 रूग्ण बरे होऊन घरी परतले एकूण 535कोरोना बाधित रूग्ण डिचोली तालुक्मयात सक्रीय आहे  सांखळीत190 मयेत 150 आणि डिचोलीत 195 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत अशी माहिती मामलेदार प्रवीण जय पंडित यांनी दिली

ङसांखळी नगरपालिका कार्यालय सॅनिटाईझङसांखळी शहरातील नगर पालिकेच्या कार्यालयात आज शनिवारी पूर्ण सॅनिटाईझ करण्यात आले आहे शहरात अचानकपणे कोरोनाचा प्रभाव दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे सांखळी मतदारसंघात झपाटय़ाने कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने आता गावातही पंचायत कार्यालयात प्रवेश बंद सांगण्याची पाळी शीपायावर आली आहे, बाहेरुनच काम सांगा आम्ही करू असे सांगितले जाते काही बॅ?क मध्ये हीच स्थिती आहे ,डॉक्टर कडे घेल्यावर असच पाहायला मिळते तेव्हा सामान्य माणसाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की आपला बचाव आपणच कराव ? हे अश्या काही गोष्टी वरून स्पष्ट दिसत असल्याने कोरोना विषयी नेमकं नाटक काय? हा सामन्य रोग का? मोठा खतरनाक रोग याची सविस्तर माहिती सरकारने नागरीकांना द्यायची गरज आहे राज्यातील आर्थिक व्यवहार नियमित चालावे, प्रजेला पैश्याची अडचण भासू नये या साठी या भयंकर रोगाकडे सरकार दुर्लक्ष करत असेल तर ते चुकीचे आहे तेव्हा नागरिकांना या विषयावर सविस्तर माहिती देऊन नागरिकांच्या प्रश्नची उत्तर सरकारला घ्यावी लागतील डॉक्टर ही या कोरोना रोगा विषयावर ठोस पणे काही सांगत नाही मात्र काहीही असो काही महिने स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सरकारी नियमांचे पालन करा सुरक्षित राहा असे जाणकार सांगतात

कोरोनाची भीती नागरिकांच्या मनातून आधी काडा                                

सांखळी मतदारसंघातिल पाळी, वेळगे, सुर्ला, कुडणे, आमोणत्, न्हवेली, हरवळे या गावात ही कोरोना या महामारीने दस्तक दिली आहे आज मतदारसंघात शेकडो रूग्ण आहेत आणि ठणठणीत पण झाले आहेत काहींना आपला जीवही गमवावा लागला असल्याने कोरोना याविषयी कमालीची चकीची समजू नागरिकांच्या मनात पेरली गेल्याने गावागावात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे  मास्क, सॅनिटाईझर, सामाजिक दुरी मनातील भीती दूर करू शकणार नाही त्यासाठी तज्ञांनी पुढे येऊन लोकांना करोना महामारी विषयावर सविस्तर माहिती देऊन आधी भीती दूर केली पाहिजे असेही जाणकार सांगतात

Related Stories

काँग्रेस जनतेचा आवाज अधिवेशनात उठवणार

Patil_p

पेट्रोलपंपवर बैलगाडी आणून काँग्रेसतर्फे इंधनवाढीचा निषेध

Amit Kulkarni

कोरोना कचरा विल्हेवाटीसाठी 25 कोटीचा प्रकल्प

Patil_p

हिवाळी अधिवेशन जानेवारी महिन्यात

Amit Kulkarni

महिला आयोगातर्फे 2 मार्च रोजी राष्ट्रीय महिला संसदेचे आयोजन

Amit Kulkarni

रेल्वे अधिकाऱयाने मागितली एलिनाची माफी

Patil_p