मुख्यमंत्र्यांनी केला हरवळेत शिवलिंगावर अभिषेक. कोरोना मुक्त आणि राज्यात सुराज्य स्थापन व्हावे अशी मनोकामना. तालुक्मयातील इतरही ठिकाणी महाशिवरात्री साजरी.


डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या हरवळे साखळीतील श्री रूदेश्वर मंदिरासह तालुक्मयातील इतर अनेक ठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. हरवळेत मोठय़ा संख्येने भाविकांनी शिवलिंगावर स्वहस्ते अभिषेक केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे मंदिरात सकाळी भेट देऊन शिवलिंगावर अभिषेक केला. कोरोन मुक्त राज्य, देश आणि जग करताना गोव्यात पुन्हा सुराज्य स्थापन व्हावे, अशी मनोकामना रूदेश्वर चरणी प्रकट केल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
हरवळेतील श्री रूदेश्वर मंदिरात वर्षानुवर्षे महाशिवरात्री मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. परंतु गेली दोन वर्षे कोवीड महामारीमुळे हा उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. यावषी कोवीड परिस्थिती नियंत्रणात आल्याने हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात आपणही सहभागी होत संपूर्ण राज्याच्या कल्याणासाठी श्री रूदेश्वर चरणी प्रार्थना केली. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
काल मंगळ. दि. 1 मार्च पहाटे 3.30 वा. मुक्तद्वार महापर्वणीला सुरुवात झाली. पहिला अभिषेक देवस्थानचे अध्यक्ष श्री यशवंत श्रीकांत माडकर यांनी केला. तर 4.00 वा. पासून समस्त भाविकांतर्फे श्रींच्या लिंगावर स्वहस्ते रुद्राभिषेकास प्रारंभ झाला. दिवसभर मोठय़ा संख्येने भाविकांनी श्री रूदेश्वराचे दर्शन घेतले आणि अभिषेक केला. रात्री स्थानिक कलाकारातर्फे भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाआरती व वाजत गाजत पालखी मिरवणूक झाली. तदनंतर श्रीं भुमिका क्रिएशन प्रस्तुत, प्रज्ञा परांजपे निर्मित व नकुळ उर्फ बंडो गावकर लिखित 2 अंकी नाटक “खुनाचा बदला” सादर करण्यात आले.
आज बुध. दि. 2 मार्च 2021 रोजी पहाटे 6.00 वा. दिवजोत्सव तदनंतर विजयरथातुन वाजत गाजत श्रींची रथ मिरवणूक. 10.00 वा पावणी. देवस्थानाचे उपमुख्यत्यार श्री वासुदेव पद्मानाथ गांवकर यांच्या यजमानपदाने देवस्थानतर्फे अर्चशुद्धीस प्रारंभ नंतर समरतना. 1.45 वा. महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
हरवळेसह डिचोली तालुक्मयातील नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिरातही महाशिवरात्री मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. याहि ठिकाणी मोठय़ा संख्येने भाविकांनी उपस्थिती लावत श्रींचे दर्शन घेतले.