Tarun Bharat

डिचोली पालिकेच्या 14 प्रभागांसाठी 88 टक्के मतदान.

            डिचोली/प्रतिनिधी

  डिचोली नगरपालिकेच्या 14 प्रभागांसाठी झालेल्या मतदानाला मतदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला. एकूण 88 टक्के मतदानाची नोंद झाली असून 12969 मतदारांपैकी 11408 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान 93.72 टक्के प्रभाग क्र. 4 मध्ये तर सर्वात कमी मतदान 80.16 टक्के प्रभाग क्र. 9 मध्ये नोंद झाले. एकूण 6357 पैकी 5588 पुरूष मतदारांनी तर 6612 पैकी 5820 महिला मतदारांनी मतदान केले.

   डिचोली नगरपालिकेच्या 14 ही प्रभागांसाठी सकाळी सुरू झालेल्या मतदान प्रक्रीयेत सर्वच प्रभागांमधील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला. सकाळीच प्रत्येक मतदानकेंद्रांवर लांबच्या लांब रांगा दिसून येत होत्या. मात्र काही मतदानकेंद्रांवर मतदानाची प्रक्रिया खुपच धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे लोकांना भर उन्हात ताटकळत उभे रहावे लागल्याने लोकांनी तसेच उमेदवारांनीही नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात नंतर निवडणूक अधिकारी दिपक वायंगणकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी लक्ष घातले आणि प्रक्रीयेला गती मिळवून दिली. या निवडणुकीत सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्राच्या बाहेर लहान सहान तक्रारी सोडल्यास कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

   प्रभाग क्र. 1 मध्ये 87.34 टक्के मतदान झाले. एकूण 711 पैकी 621 मतदान झाले. 339 पैकी 297 पुरूषांनी तर 372 पैकी 324 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 2 मध्ये 87.52 टक्के मतदान झाले. एकूण 825 पैकी 722 मतदारांनी मतदनाचा हक्क बजावला. 395 पैकी 351 पुरूष तर 430 पैकी 371 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 3 मध्ये 86.41 टक्के मतदान झाले. एकूण 979 पैकी 846 मतादारांनी मतदान केले. 474 पैकी 409 तर 505 पैकी 437 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 4 मध्ये 93.72 टक्के मतदान झाले. एकूण 653 पैकी 612 मतदारांनी मतदान केले. 331 पैकी 307 पुरूष तर  322 पैकी 305 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 5 मध्ये 89.88 टक्के मतदान झाले. 899 पैकी 808 मतदारांनी मतदान केले. 457 पैकी 416 पुरूष तर 442 पैकी 392 महिलांनी मतदान केले.

    प्रभाग क्र. 6 मध्ये 91.25 टक्के मतदान झाले. एकूण 800 पैकी 730 मतदारांनी मतदान केले. 390 पैकी 358 पुरूष तर 410 पैकी 372 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 7 मध्ये 90.32 टक्के मतदान झाले. एकूण 754 पैकी 681 मतदारांनी मतदान केले. 377 पैकी 350 पुरूष तर 377 पैकी 331 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 8 मध्ये 86.69 टक्के मतदान झाले. एकूण 1172 पैकी 1016 मतदारांनी मतदान केले. 551 पैकी 462 पुरूष तर 621 पैकी 554 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 9 मध्ये 80.16 टक्के मतदान झाले. 1099 पैकी 881 मतदारांनी मतदान केले. 552 पैकी 442 पुरूष तर 547 पैकी 449 महिलां?नी मतदान केले.

   प्रभाग क्र. 10 मध्ये 85.49 टक्के मतदान झाले. एकूण 1151 पैकी 984 मतदारांनी मतदान केले. 581 पैकी 491 पुरूष तर 570 पैकी 493 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 11 मध्ये 91.58 टक्के मतदान झाले. एकूण 986 पैकी 903 मतदारां?नी मतदान केले. 471 पैकी 436 पुरूष तर 515 पैकी 467 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 12 मध्ये 87.70 टक्के मतदान झाले. एकूण 821 पैकी 720 मतदारांनी मतदान केले. 411 पैकी 360 पुरूष तर 410 पैकी 360 महिलांनी मतदान केले. प्रभाग क्र. 13 मध्ये 86.20 टक्के मतदान झाले. एकूण 1065 पैकी 918 मतदारांनी मतदान केले. 520 पैकी 454 पुरूष तर 545 पैकी 464  मतदारांनी मतादान केले. प्रभाग क्र. 14 मध्ये 91.55 टक्के मतदान झाले. एकूण 1054 पैकी 966 मतदारांनी मतदान केले. 508 पैकी 465 तर 546पैकी 501 महिलांनी मतदान केले.

Related Stories

राम राज्य दिग्वजिय रथ यात्रा समिती

Amit Kulkarni

विदेशात नोकरीचे आमिष दाखवून अपहरण करणारी टोळी गजाआड

tarunbharat

माशेल येथे शिक्षकाची आत्महत्या

Amit Kulkarni

फोंडा तालुक्यातील रुग्णांना ‘दिलासा’ नाहीच !

Patil_p

मेणकुरे वेषभूषा स्पर्धेत देवांश, ओमश्री, पारवी प्रथम

Amit Kulkarni

हडफडेत पाच लाखांचा गांजा जप्त

Amit Kulkarni