Tarun Bharat

डिचोली बाजार 50 टक्केच भरला, तरीही सामाजिक अंतराचे तीनतेरा

केवळ भाजी विपेत्यांना मुभा. कपडे व इतर विपेत्यांना बंदी. पुरूमेताचे सामान बाजारात उपलब्ध.

प्रतिनिधी / डिचोली

डिचोली बाजारात काल बुधवारचा आठवडा बाजार केवळ 50 टक्केच भरविण्याचा डिचोली नगरपालिकेचा निर्णय योग्य ठरला खरा. मात्र या बाजारात फिरताना आणि खरेदी करताना विपेत्यांकडून सामाजिक सुरक्षा अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. बाजारात लोकांकडून येणाऱया सल्ल्यांनुसार केवळ भाज विपेत्यांनाच बसण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र तरीही लोकांची गर्दी झालीच.

सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाटय़ाने होत असलेली वाढ पाहता सार्वजनिक ठिकाणी गर्द? होऊ नये. यासाठी प्रत्येकजण आग्रही आहे. डिचोलीचा साप्ताहिक बुधवारचा बाजार भरवायचा काही नाही याबाबत चर्चा झाल्यानंतर लोकांना सोयीस्कर आवश्यक या तत्वावर केवळ भाजी विपेत्यांनाच बाजारात अंतर ठेऊन बसण्याची मुभा देण्याचे ठरविण्यात आले. बाजारात दुकाने थाटणाऱया कपडे विपेता आणि इतर विपेत्यांना बाजारात दुकाने थाटू देऊ नये असे ठरविण्यात आले.

त्यानुसार डिचोलीचा बाजार बुधवारी सकाळीपासून सुरू झाला. सकाळीच या बाजारात पुरूमेताचे सामान खरेदीसाठी लोकांनी गर्दी केलेली दिसून आली. दुपारच्या वेळी गर्दी काहीशी कमी होती. मात्र संध्याकाळी बाजारात तोबा गर्दी दिसून आली. बाजारात येणारे ग्राहक मास्क परिधान करून फिरत होतेच, मात्र काही विपेते आपल्या तोंडावरील मास्क नाक व तोडांच्या खाली काढून वावरत होते. पोलीस किंवा नगरपालिकेचे अधिकारी दंड बजावतील म्हणून काही विपेते तितकाच वेळ मास्क पूर्णपणे परिधान करीत होते. असे चित्र दिसून येत होते.    हा एप्रिल महिना असल्याने या मोसमात बाजारात गोमंतकीयांसाठी पावसाळी पुरूमेताचे सामान विक्रीसाठी येते. डिचोलीच्या बाजारातही काल सुकी मिरची, कैऱया, आमसुले, कोकमसुले, चवळी व इतर सामानही विक्रीस आले होते. ते सामान खरेदीसाठी गोमंतकीयांनी मोठी गर्दी केली होती. हि गर्दी मात्र सकाळच्याच वेळी होती.

Related Stories

पुण्यातून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

अट्टल चोरटय़ाला पणजी पोलिसांनी केली अटक

Patil_p

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक-गांधीवादी तुळशीदास मळकर्णेकर यांचे निधन

Patil_p

निर्मला सीतारामण 11 रोजी गोव्यात

Amit Kulkarni

कोपार्डे येथे वीज ट्रान्सफॉर्मर जळून लाखोंचे नुकसान

Omkar B

जागतिक पोस्ट दिनानिमित्त आज पणजीत कार्यक्रम

Amit Kulkarni