Tarun Bharat

डिजिटल ग्रंथालय ही काळाची गरज

Advertisements

शहर केंद्र गंथालयामध्ये डिजिटल ग्रंथालय सदस्य नोंदणी अभियान

प्रतिनिधी/ बेळगाव

आजच्या स्पर्धात्मक जगात आवश्यक ते तंत्रज्ञान आत्मसात करून यश मिळविणे आवश्यक आहे, असे मत सार्वजनिक ग्रंथालय विभागाचे संचालक डॉ. सतीशकुमार होसमनी यांनी व्यक्त केले.

शहर केंद्र गंथालयामध्ये डिजिटल गंथालय सदस्य नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. सध्या डिजिटल ग्रंथालयासाठी बेळगाव जिल्हय़ात 13400 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, असे ते म्हणाले. शालेय विद्यार्थी व स्नातकोत्तर विद्यार्थी यांच्या सोयीसाठी देशी आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे, नियतकालिके या डिजिटल ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. तसेच सध्या 78 हजार पुस्तके अपलोड करण्यात आली असून, आणखी 40 हजार पुस्तके अपलोड करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा व शहर केंद्र गंथालयातील कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. उपनिर्देशक रामय्या यांनी प्रास्ताविक करून डिजिटल गंथालय ही ग्रंथालय विश्वातील क्रांती आहे, असे सांगितले. याप्रसंगी निवृत्त उपनिर्देशक डी. ए. कुलकर्णी उपस्थित होते. ए. ए. कांबळे यांनी स्वागत केले. इ. एम. आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. निलव्वा पट्टेद यांनी आभार मानले

Related Stories

वाहतूक पोलिसांतर्फे वाहने उचलण्याची मोहीम

Patil_p

कंझ्युमर आयुक्त फोरमसाठी वकिलांचे आजही कामबंद आंदोलन

Rohan_P

अनगोळ येथे चिखलाचे साम्राज्य

Amit Kulkarni

श्री पंत महाराजांच्या 117 व्या पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

रेल्वे पोलिसातील वर्दीतले दर्दी!

Amit Kulkarni

मुख्याध्यापक बी.पी.कानशिडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!