Tarun Bharat

डिजिटल विश्वात पोस्ट कार्ड टिकून

Advertisements

विद्याधर पिंपळे/कोल्हापूर

माणसाच्या सुख-दुखःचा संदेश पाठवणारे व लाखो लोकांच्या  हातात पडणारे पिवळे पातळ पुठयाचे आयताकृती पोस्ट कार्ड हे आजच्या आधुनिक व्हॉटस् अपच्या जगात टिकून असून याची विक्री वाढतच आहे. गेल्या चार वर्षात कोल्हापूरातील विविध पोस्ट कार्यालयामधून, पोस्ट कार्डच्या विक्रीची संख्या लाखामध्ये वाढत आहे. भारतातील पहिल्या पोस्ट कार्डची किंमत अवघे तीन पैसे (अर्धा आणा) इतकी होती. आजच्या महागाईतही याची किंमत फक्त 50 पैसे इतकीच ठेवण्यात आली आहे.

1688 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे बंगाल प्रांताचे गर्व्हनर वार्न हेस्टिंग्ज यांनी आपल्या व्यवसायासाठी मुंबई,मद्रास येथे पहिली टपाल सेवा सुरू केली. 1774 ला ही टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. आज देशभर 1 लाख 55 हजार 333 टपाल कार्यालये सुरू असून,आज 39 देशामधील आपल्या एअर मेलच्या सेवेची  जागतिक भरारी घेतली आहे. भारतात पहिला भारतीय टपाल कायदा करून, ही सेवा जनतेसाठी  खुली करण्यात आली. यानिमित्याने. सहा ऑक्टोबर हा जागतिक पोस्ट दिन साजरा केला जात आहे. तर 8 ऑक्टोबर 1874 ला स्विर्त्सर्लंडच्या बर्न येथे 22 देशांनी युनिव्हर्सल पोस्टल युनियन करारावर स्वाक्षरी करून 9 ते 14 ऑक्टोबर हा जागतिक पोस्ट आठवडा साजरा करण्याचा निर्णय  घेण्यात आला.  यातूनच पोस्ट कार्डव्दारे पोस्ट सेवेला प्रारंभ झाला.

1872 मध्ये ब्रिटनमध्ये पहिले, तर भारतामध्ये एक जूलै 1879 ला पहिले पोस्ट कार्ड वितरीत करण्यात आले. पोस्ट कार्डच्या पहिल्या वर्षीच्या विक्रीच्या तिमाहीत साडे सात लाख रूपयाची पोस्ट कार्डे विकली गेली. तर भारतीय पोस्ट कार्डच्या शताब्दीसाठी 1979 ला 2100 दशलक्ष पोस्ट कार्डचे वितरण करण्यात आले होते.  1990 मध्ये देशात एसटीडी, पीसीओ  व इंटरनेटच्या युगातही पोस्ट कार्डचा वापर आजही टिकून आहे. कार्पोरेट कंपन्या तसेच सुरभिसारख्या क्विझसाठी पोस्ट कार्डांचा वापर होऊ लागला आहे.  पोस्ट विभागाला उत्पन्न मिळावे यांसाठी 2002 मध्ये मेघदूत हे पोस्ट कार्ड सुरू करण्यात आले. या मेघदूत कार्डच्या पत्याच्या बाजूला जाहीरात करण्याची मुभा देण्यात आली  होती.

देशातील पोस्ट विभागाची पहिली  हवाई वाहतूक सेवा 18 फेब्रुवारी 1911 ला सुरू झाली. अलाहाबादवरून नैनीताल येथे टपाल पाठवण्यात आले होते. आज 39 देशामध्ये एअर मेलची सेवा सुरू आहे.

पोस्टाची आता अत्याधुनिक सेवा

पारंपारीक पोस्ट विभागाने आता कात टाकली असून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही पदार्पण केले आहे. ई-पोस्ट,ई-बिल,स्पीड पोस्ट,बिजनेस पोस्ट,लॉजिस्टीक पोस्ट,एक्सप्रेस पार्सल पोस्ट,मीडिया पोस्ट,गीटींग पोस्ट,स्पीड नेट,इंटरनॅशनल मेल्स,इंटरनॅशनल ई.एम. एस.,मनी ऑर्डर,इंटरनॅशनल मनी ऑर्डर,पोस्ट बचत बँक,इलेक्ट्रॉनिक फंड, ट्रान्स्फर (ईएफटी),डाक विमा योजना आदी अत्याधुनिक सेवा. सुरू केली आहे.

पोस्टल इंडेक्स नंबर (पिनकोड )

आपले पत्र वा पार्सल तात्काळ व योग्य पत्यावर मिळावे यासाठी 15 ऑगष्ट 1972 ला पिनकोड ही सेवा पोस्टाकडून देशभरात सुरू करण्यात आली आहे. या सहा आकडी पिनकोडमुळे आपले पत्र योग्य ठिकाणी मिळते. या साठी नऊ विभाग करण्यात आले असून, पिनकोडचा नववा विभाग हा आर्मी पोस्टल सर्व्हिससाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

देशात पोस्टाचे 22 सर्कल्स

भारतात पोस्टाचे 22 सर्कल्स असून कोलहापूर हे गोवा सर्कलमध्ये येत आहे. मुख्य पोस्टमास्तर,वरिष्ठ टपाल अधिक्षक,प्रवर अधिक्षक असा विभाग आहे. पोस्टाच्या वजन व अंतरावर सेवाशुल्क आकारला जात होता. पण आता फक्त अंतरावरच शुल्क आकारला जात आहे. 21 किलोमीटर किंवा 7115 लोकसंख्येवर एक पोस्ट ऑफीस सुरू केले जाते.

कोल्हापूरात पोस्ट कार्डच्या विक्रीत वाढ

कोल्हापूर पोस्ट विभागाकडून  जनतेसाठी अत्याधुनिक विविध सेवा दिल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्हयात 98 पोस्ट कार्यौलये असुन,यातील 17 कार्यालये शहरात आहेत. 2015 मध्ये कोल्हापूर जिल्हयातून 11 लाख पोस्ट कार्डची विक्री झाली होती या विक्रीत वाढच असून, 2019 मध्ये पोस्ट कार्डची विक्री साडे बारा लाख इतकी झाली आहे. –प्रवर अधिक्षक ईश्वर पाटील

Related Stories

पद्मजा पोळ हिच्या चित्रकृतीच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन

Abhijeet Shinde

‘अलायन्स एअर’ ची विमानसेवा कोलमडली

Abhijeet Shinde

काजू कारखानदारांच्या समस्या, अडचणीबाबत समरजित घाटगे यांचे जिल्हा प्रबंधकांना निवेदन

Abhijeet Shinde

Satara : आई व बछड्याची अखेर भेट ! वनविभागाची मोहिम यशस्वी

Abhijeet Khandekar

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! मालमत्तेच्या वादातून पोटच्या मुलाने वडिलांना जाळले

Archana Banage

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कळंबा, मोरेवाडी,पाचगाव ग्रामपंचायतींना नोटीस

Archana Banage
error: Content is protected !!