Tarun Bharat

डिपेंडेंट फ्लोअर’ एक चांगला पर्याय

Advertisements

महानगर किंवा शहरात वाजवी किंमतीत घर खरेदीचा विचार करत असाल तर इंडिपेंडंट फ्लोर्स म्हणचे स्वतंत्र मजल्याचा बंगला हा एक चांगला पर्यायं उपलब्ध आहे.

शहराचे आकारमान वाढत चालले असून परिसरातील खेडी शहरवस्तीत सामील होत आहेत. त्यामुळे शहराचा विस्तार हा वीस ते पंचवीस किलोमीटरपर्यंत वाढला आहे. अशावेळी मनासारखे आणि वाजवी किंमतीत घर मिळणे कठिण बाब आहे. प्रत्यक्षात शहरात घर घेणे हे सामान्यांच्या आवाक्मयाबाहेर आहे. परंतु उपनगर किंवा परिसरात घराच्या किंमती अजूनही आवाक्मयात आहेत. या भागात स्वतंत्र भूखंडावर आणि बहुमजली इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये वाजवी किंमतीत अजूनही घरे उपलब्ध आहेत. पूर्वी नागरिक स्वत: प्लॉट खरेदी करुन त्यावर बिल्डिंग उभारत होते. परंतु जमिनीच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ आणि भूखंडाचे कमी होणारे आकार पाहता नागरिकांनी घरासाठी अन्य पर्याय शोधण्यास सुरवात केली. त्यात अपार्टमेंटचा प्रामुख्याने विचार केला गेला. आता अपार्टमेंटमधील घरे देखील महागडी होत चालली आहेत. म्हणून आणखी काही नवीन पर्यायाचा शोध काढला जात आहे. या क्रमवारीत इंडिपेंडेट फ्लोर्सची श्रेणी आघाडीवर आहे. (यात जमिनीसह दोन मजल्यांचा समावेश असतो) कारण इंडिपेंडेट फ्लोअरच्या किंमती अजूनही काही शहरात परवडणाऱया श्रेणीत आहेत.

तज्ञांच्या मते, शहरालगतच्या परिसरात तसेच नजिकच्या भागात इंडिपेंडटच्या फ्लोर्स सहजपणे उपलब्ध होत आहेत. घर खरेदीचा विचार केला जात असेल तर हा पर्याय उत्तम सिद्ध होत आहे. कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे परवडणारी किंमत. अपार्टमेंट किंवा प्लॉटच्या तुलनेत इंडिपेंटस फ्लोरचे घर अधिक सुविधायुक्त ठरु शकते. मोठय़ा शहरात कमी किंमतीत अपार्टमेंट मिळणे खूपच कठिण झाले आहे. काही भागात कमी किंमतीत अपार्टमेंट मिळतात, परंतु तेथील जीवनशैली फारशी आधुनिक आणि उपयुक्त नसते.

पर्यायांची कमतरता नाही

परवडणाऱया श्रेणीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच शहराबाहेरच्या परिसरात इंडिपेंडट फ्लोर खरेदी करणे हा अधिक फायद्याचा सौदा ठरु शकतो. उत्तर भारतात मोठय़ा शहरात मालमत्तेच्या किंमती अधिक दिसून येतात. म्हणूनच उत्तर भारताबरोबरच अन्य महानगरातही तीस लाखांपर्यंत सुस्थितीत घर मिळणे हे खूपच कठिण काम आहे. आपल्या खिशाला परवडणारे घर मिळण्याची शक्मयता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अशा वेळी शहरालगच्या परिसरात मालमत्ता खरेदी करणे हा चांगला निर्णय ठरु शकतो.

चंडीगडचा विचार केल्यास खरड, लांडरा सडक, डेरा बस्सी, मुल्लांपूर तसेच मोहाली जिह्यातील जीरकपूर येथे मालमत्ता अजूनही परवडणाऱया किंमतीत उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्राचा विशेषत: पुण्याचा विचार केल्यास पुणे परिसरातील दौड, चाकण, पिरंगुट, डोणजे, मांजरी, उंड्री, सोलापूर हायवे परिसर, वाघोली परिसर या भागात घराच्या किंमती पन्नास लाखांच्या आतच आहेत. असे असले तरी तेथे स्वत:चा भूखंड खरेदी करणे देखील महागडे ठरु शकते. तरीही स्वत: जमीन खरेदी करुन त्यावर घर बांधणे किंवा रेडी पझेशनची सिंगल रुम, टू बीएचके किंवा थ्री बीएचके फ्लॅट खरेदी करण्याव्यतिरिक्त तिसरा पर्याय म्हणून इंडिपेंडट फ्लोरकडे पाहता येईल.

इंडिपेंडट फ्लोर्स

शहरालगत परिसरात इंडिपेंडट फ्लोरच्या उपलब्धतेत अलीकडेच वाढ झाली आहे. डेव्हलपर तसेच ग्राहक मंडळी अन्य पर्यायांच्या तुलनेत या पर्यायांचा अधिक विचार करत आहेत. बाजारात सध्या मंदीचा माहोल असल्याने या श्रेणीतील खरेदीत नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक स्थानिक आणि नामांकित बिल्डर देखील टू बीएचके आणि थ्री बीएचके असणारे इंडिपेंडट फ्लोरच्या इमारतीची निर्मिती करत आहेत.

अन्य पर्याय

भूखंड: काही भागात भूखंड देखील खरेदी करु शकतो. त्यावर घराच्या बांधकामासाठी अंदाजे दहा ते पंधरा लाखापुढे खर्च येऊ शकतो. अशा वेळी प्लॉट खरेदी करुन त्यावर घर बांधण्यासाठी एकूण खर्च हा साधारणपणे 25 ते 30 लाख रुपये येऊ शकतो.

अपार्टमेंट: अलीकडच्या काळात मोठय़ा शहरात किंवा उपनगरात अपार्टमेंटमध्ये घरांची मोठय़ा संख्येने उपलब्धता आहे. परवडणाऱया घरांचा विचार केल्यास या भागात शंभर ते 120 चौरस मीटर (सुपर बिल्डअप एरिया) क्षेत्रफळाचे 2 बीएचके किंवा थ्री बीएचके फ्लॅट सुमारे 30 लाख रुपयांना उपलब्ध होत आहेत. अपार्टमेंटची निवड करण्यापूर्वी परिसर, पायाभूत सुविधा आणि जीवनशैलीचे आकलन करावे.

कमलेश गिरी

Related Stories

बेडरूम

Patil_p

प्रधानमंत्री आवास योजनेची गती आणि अनुदानाचा लाभ

Patil_p

याला म्हणतात ‘प्रजा’सत्ताक

Patil_p

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न 64 वर्षापासून लोंबकळत

Patil_p

लक्झरी घरे झाली स्वस्त

Patil_p

प्रकल्पांसाठी सहा महिने वाढीव कालावधी

Patil_p
error: Content is protected !!