Tarun Bharat

डिमिट्रोव्ह, मिलमन, ओपेल्का विजयी

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या 2022 च्या डेलरे बीच खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत बल्गेरियाच्या तृतीय मानांकित डिमिट्रोव्हने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना अमेरिकेच्या प्रुगेरचा पराभव केला. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा जॉन मिलमन आणि ओपेल्का यांनीही आपले विजय नोंदविले आहेत. गुरुवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या एकेरीच्या सामन्यात डिमिट्रोव्हने कुगेरचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. या स्पर्धेत डिमिट्रोव्हने दुसऱयांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. दुसऱया एका सामन्यात ओपेल्काने जॅक सॉकचा 6-7 (6-8), 7-6 (7-4), 6-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने गिरॉनवर 6-3, 7-6 (8-6) त्याचप्रमाणे फ्रान्सच्या मॅनेरिनोने नाकाशिमावर 6-4, 2-6, 7-5 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

कोरियाचा केओन वू विजेता

Patil_p

झिंबाब्वे संघाच्या कर्णधारपदी चिभाभाची निवड

Patil_p

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला सायबर चोरांचा गंडा

datta jadhav

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील 5 जणांना कोरोना; BCCI कडून वेळापत्रात बदल

datta jadhav

दशकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी कोहली, अश्विनला नामांकन

Patil_p

मेसीसह चार फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण

Patil_p