Tarun Bharat

डिमॅट खात्याची संख्या पोहचली 1 कोटी पार

जानेवारीत गाठला टप्पा ः याआधी ऑगस्टमध्ये 2.21 लाख खाती उघडली

वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली

शेअरबाजारात समभागांमध्ये गुंतवणुकीसाठी डिमॅट खाते उघडण्याची गरज असते. जानेवारी महिन्यामध्ये देशातील डिमॅट खात्यांची एकूण संख्या 1 कोटी 10 लाखावर पोहचली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस आणि नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये 2.21 लाख इतक्या या आधी सर्वाधिक डिमॅट खात्याची नोंद झाली होती. गेल्या जानेवारीमध्ये 2 लाख नव्या डिमॅट खात्यांची भर पडली आहे. महिन्याच्या स्तरावर पाहता डिमॅट खाती तशी कमीच उघडली गेली आहेत. बाजारामध्ये चढउताराचा प्रवास असल्याने त्याचबरोबर जागतिक अस्थिरतेचा परिणामही बाजाराला जाणवत असल्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.

याचदरम्यान अदानी एंटरप्रायझेस यांच्याकडून अलीकडेच एफपीओचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी नव्या रिटेल गुंतवणूकदारांनी डिमॅट खाती उघडली होती. परंतु सध्याला अदानी यांनी हा एफपीओ मागे घेतला आहे. नव्या आयपीओ किंवा एफपीओमुळे नव्या गुंतवणूकदारांची संख्या बाजारात वाढलेली आहे. सध्याची ही अस्थिरता गुंतवणूकदारांच्या चिंतेची बाब ठरली असून याचा परिणाम नवी डिमॅट खाती उघडण्यावरही आगामी काळात दिसणार आहे. यंदाचे बजेट चांगले मांडलेले असून रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केली असली तरी बाजार तसा सावरलेलाच आहे. आगामी काळात बाजाराच्या दिशेनुसार या क्षेत्रातील नव्या गुंतवणूकदारांची संख्या ठरणार आहे, हे नक्की.

Related Stories

पोलादाच्या आयात शुल्कात घट होणार?

Patil_p

ओरियंट ग्रीन पॉवरला 6 कोटीचा नफा

Patil_p

‘रिलायन्स’चे समभाग दोन आठवडय़ात 14 टक्क्यांनी वधारले

Patil_p

खेळणी-सायकल उद्योगासाठी पीएलआय अंतर्गत 7000 कोटी

Patil_p

जीवन विमा कंपन्या अतिरीक्त खर्च थांबविणार?

Patil_p

‘ब्रिटानिया’च्या समभागधारकांनी गुंतवणूक प्रस्ताव नाकारला

Patil_p
error: Content is protected !!