Tarun Bharat

डिसेंबर दुसऱया आठवडय़ापासून शाळा सुरू?

Advertisements

दोन दिवसांत निर्णय होणार, शिक्षकांसाठी हजरी सक्तीची

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर शाळा कधी पासून सुरु करायची? या विषयी अद्याप चर्चा सुरूच आहे. शिक्षकांसाठी 2 नोव्हेंबरपासून हजरी सक्तीची करण्यात आली असून डिसेंबर दुसऱया आठवडय़ापासून शाळा सुरु करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. दोन दिवसांत या संबंधी निर्णय होण्याची शक्मयता आहे.

विद्यागम योजनेला सध्या स्थगिती देण्यात आली असून 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाशिक्षणाधिकाऱयांबरोबर शिक्षण खात्याचे आयुक्त व्ही. अन्बुकुमार ऑनलाईन संवाद साधणार आहेत. डिसेंबर दुसऱया आठवडय़ापासून शाळा सुरू करायची का? या विषयी जिल्हाशिक्षणाधिकाऱयांकडून माहिती घेण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात कॉलेज सुरू करावेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा एक दिवसाआड सुरू करण्यासंबंधीही चर्चा सुरू आहे. विद्यागम योजनेतील विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर 12 ऑक्टोबर पासून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. ही सुट्टी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता शिक्षकांना हजरी सक्तीची आहे.

2 नोव्हेंबरपासून शिक्षक व कर्मचाऱयांना शाळेला यायचे आहे. मात्र त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये,अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. ऑनलाईन शिक्षणावर सध्या भर द्यावा. मुलांना या संबंधी माहिती द्यावी, भविष्या दूरदर्शन व आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे.

Related Stories

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आरणा असुंडी विजेती

Amit Kulkarni

लोकमान्य श्रीराम मंदिरात दीपोत्सव साजरा

Amit Kulkarni

जैन समाजाच्या विकासात पुरोहितांची भूमिका महत्त्वाची

Amit Kulkarni

सीएस परीक्षेत अखिलेश जोशी यांचे यश

Patil_p

हत्तींसाठी न सांगता नेले ऊसपीक

Amit Kulkarni

हळद लागली मात्र अक्षता थांबल्या…!

Omkar B
error: Content is protected !!