Tarun Bharat

डिसेंबर पूर्वी मांदेतील सर्व प्रकल्प आणि नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन होईल

पेडणे ( प्रतिनिधी )

मांदे मतदार संघातील जे उर्वरित किंवा अर्धवट प्रकल्प आहेत किंवा आमदार दयानंद सोपटे यांची विकास कामे प्रकल्प असतील ते सर्व प्रकल्प डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मांदे येथे आपत्कालीन निवारा सोय प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर  दिली.

  यावेळी मांदेचे आमदार दयानंद सोपटे, जलसिंचन खात्याचे  अधिकारी प्रमोद बदामी, मांदे सरपंच सुभाष आसोलकर, पार्से सरपंच प्रगती सोपटे , मोरजी उपसरपंच अमित शेटगावकर, पंच विलास मोरजे, पंच तुषार शेटगावकर, मांदे पंच संतोष बर्डे, केरी माजी सरपंच सौ .केरकर, सरपंच सुरज नाईक, प्रशांत  नाईक, पंच डेनिस ब्रिटो भाजपा मंडळ अध्यक्ष मधू परब आदी उपस्थित होते.

ड़ जुनासवाडा मांदे येथे 5 कोटी 40 लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आले आपत्तीकालीन परिस्थिती राहण्यासाठी निवारा घर प्रकल्प

 ड़ मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पुढे बोलताना या प्रकल्पाचा वापर नागरिकांनी जास्तीत जास्त करावा, असे आवाहन केले. असे एकूण 14 प्रकल्प आहेत त्यातला पहिला प्रकल्प आमदार दयानंद सोपटे यांनी पुढाकार घेतल्याने हा प्रकल्प पूर्ण व्हायला मदत झाली. सकारात्मक विचार असेल तर आमदार सोपटे सारख्या आमदरामुळे असे प्रकल्प रखडले जात नाही. आमदार दयानंद सोपटे याना आमदार म्हणून एखादा प्रकल्प रखडेल म्हणून भीती वाटणे साहजिकच आहे परंतु आमदार सोपटे यांचे कोणतेच प्रकल्प रखडले जाणार नाही . त्यांनी पुन्हा यादी किंवा आठवण करून द्यावी, डिसेंबर पूर्वी ते प्रकल्प पूर्ण केले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री डा?. प्रमोद सावंत यांनी दिले.

ड़ या निवारा घराचा वापर कराः डा?.प्रमोद सावंत

यावेळी बोलताना हे निवारा घर हे कायम स्वरूपी वापरात यावे.फक्त आपत्ती काळातच त्याचा वापर  न करता अन्य वेळीही तो व्हावा.शाळा विविधा संस्था , महिला ग्रुप चसेचे राज्याबाहेरील स्वयंसेवी संस्था यांनाही गोव्यात आल्यानंतर मांदे परिसरात आल्यावर ते या घराचा वापर करु शकतात.त्यासाठी आमदार सोपटे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली समितीने तसेच पंचायतीने  यासाठी पुढाकार घेऊन अशा गरजवंताना तसेच सामाजिक संस्थाना नाममाञ शुल्क आकारुन ही वास्तू  वापरण्यासाठी द्यावी असे सांगितले .

Related Stories

वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Patil_p

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या विलिनीकरणाचा दावा खोटा

Omkar B

‘कार्डियला’ जहाज मुरगाव बंदरात दाखल

Amit Kulkarni

आगामी चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Patil_p

कारची ट्रकला मागून धडक

Amit Kulkarni

दीड लाखाची चोरी करणाऱया चोरटय़ास 24 तासात अटक

Amit Kulkarni