Tarun Bharat

डीके लायन्स विजयी, लॉगर स्पोर्ट्सची एक्स्ट्रीमवर निसटती मात

कै. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

कै. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून डीके लायन्सने अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाचा 4 गडय़ानी तर लॉगर संघाने एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचा अटीतटीच्या सामन्यात 2 धावानी पराभव केला. वासीम हुदली (डीके लायन्स), सलमान गोकाककर (लॉगर) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर बुधवारी सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्सने 20 षटकात 9 बाद 129 धावा केल्या. त्यात रोहितकुमार ए.सी.ने 27, विशाल बेडका व जिनत मुडबागील यांनी प्रत्येकी 25 तर स्वप्नील एळवेने 18 धावा केल्या. डीके लायन्सतर्फे केतज कोल्हापुरेने 23 धावात 3 तर राहुल बजंत्री, फरहान पटेल, वासीम हुदली, हर्ष पॅट्रोट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल डीके लायन्सने 18.5 षटकात 6 बाद 134 धावा करून सामना 4 गडय़ानी जिंकला. त्यात अभिषेक देसाईने नाबाद 27, विनोद देवाडिगाने 26, दर्शन पाटीलने 24 तर वासीम हुदलीने 22 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे रोहितकुमार ए.सी.ने 14 धावात 4 तर वसंत शहापुरकर व मुदस्सर नजर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात लॉगर संघाने 20 षटकात 6 बाद 166 धावा केल्या. त्यात निलेश पाटीलने 53, सलमान गोकाककरने 40, केसर खाजरने नाबाद 28 तर वासीम धामणेकरने 16 धावा केल्या. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सतर्फे विशाल गौरगोंडाने 8 धावात दोन, सात्वीक गुदारेड्डीने 23 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एक्स्ट्रीम स्पोर्ट्सला 20 षटकात 8 बाद 164 धावापर्यंतच मजल मारता आल्याने त्यांना 2 धावानी पराभव पत्करावा लागला. त्यात संतोषने 33, आकाश कटांबळेने  23, सात्वीक गुदारेड्डी व सागर गौरगोंडा यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. लॉगरतर्फे केसर खाजरने 23 धावात 2 तर विनायक कांबळेने 28 धावात 2 गडी बाद केले.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अजित पाटील, रणजित पाटील, मिलिंद बेळगावकर, नागेश चव्हाण, केतन चौगुले यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल विनोद देवाडिगा, सर्वाधिक षटकार विशाल बेडका, इम्पॅक्ट खेळाडू रोहितकुमार ए. सी. व सामनावीर पुरस्कार वासीम हुदली यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे जयराज हलगेकर, प्रवन राठोड, डॉ. मार्टीन सिनापूर व अमित धामणेकर यांच्याहस्ते उत्कृष्ट झेल सलमान गोकाककर, सर्वाधिक षटकार आकाश कटांबळे, इम्पॅक्ट खेळाडू निलेश पाटील, सामनावीर सलमान गोकाककर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

गुरूवारचे सामने : साईराज वॉरियर्स वि. झेवर गॅलरी सकाळी 9 वा. 2) विश्रुत स्ट्रायकर्स वि. साई स्पोर्ट्स दुपारी 2 वा.

Related Stories

ड्रेनेज वाहिन्या बदलल्या; रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

सुळेभावी रेल्वेस्थानकावर बसविली इलेक्ट्रॉनिक प्रणाली

Amit Kulkarni

‘त्या’ माथेफिरूंवर कारवाई करा

Patil_p

टिळकवाडी भंगीबोळात कचऱयाचे साम्राज्य

Amit Kulkarni

चव्हाट गल्लीत वाहनांची वर्दळ

Amit Kulkarni

फेसबुक प्रेंड्स सर्कलतर्फे जीवनावश्यक साहित्याची मदत

Omkar B