Tarun Bharat

डी.के.शिवकुमार यांनी स्वीकारला केपीसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी बेंगळूर येथे झालेल्या कार्यक्रमात कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्याकडून हा पदभार स्वीकारला. कोरोनामुळे अनुपस्थितीत असलेल्या कर्नाटकमधील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

माजी मंत्री आणि विद्यमान आमदार, शिवकुमार यांना 11 मार्च रोजी केपीसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. काँग्रेसमध्ये आमदारांनी बंडखोरीकरत राजीनामे दिले. राजीनामे दिलेल्या सर्व आमदारांनी भाजमध्ये प्रवेश केला. या रिक्त झालेल्या 15 जागांसाठी नोव्हेंबर 2019 मध्ये पोटनिवडणुक घेतली. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. कॉंग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर दिनेश गुंडू राव यांनी राजीनामा दिला. यांनतर रिक्त असलेल्या या पदावर शिवकुमार यांची वर्णी लागली.

Related Stories

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप कुरुंदवाडे

Amit Kulkarni

पतंगाच्या मांजाने घेतला बालकाचा बळी

mithun mane

एकीची वज्रमूठ अभेद्य ठेवा!

Amit Kulkarni

इनरव्हील क्लबतर्फे डॉ. कमलाकर आचरेकर यांचे व्याख्यान

Omkar B

भिडे गुरुजींची अनगोळ येथील गणेशोत्सव मंडळांना भेट

Amit Kulkarni

चाक गेले पुढे पुढे… बस पाठीमागे

Amit Kulkarni
error: Content is protected !!