Tarun Bharat

‘डेक्‍सामेथासोन’ कोरोनावर रामबाण औषध; मृत्यूदर घटविते

ऑनलाईन टीम / लंडन : 

‘डेक्‍सामेथासोन’ हे कोरोनावर रामबाण औषध ठरत आहे. या औषधात स्टिरॉईडचे प्रमाण कमी असून, याच्या डोसमुळे कोरोनाबाधित रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्णांचा जीव वाचवण्यात यश आल्याचे ब्रिटनच्या संशोधकांनी म्हटले आहे. 

‘डेक्‍सामेथासोन’ हे कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारे पहिले औषध ठरले आहे. ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत डेक्सामेथासोन औषधाचा वापर करून 2000 रूग्णांवर उपचार करण्यात आला. या चाचणीत असे आढळले की, हे औषध एक तृतीयांश रुग्णांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले आहे. या औषधाचा रुग्णांवर वापर करण्यास ब्रिटन सरकारने मान्यता दिली आहे. 

डेक्सामेथासोन औषध विशेषत: व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर उपायकारक आहे. अद्याप सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा कितपत फायदा होत आहे, याबाबत संशोधन झालेले नाही. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

लसीकरण जाहीर

Patil_p

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

Archana Banage

सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच, एक जवान शहीद

Tousif Mujawar

कर्नाटक: मंगळूरमध्ये निपाह संशयित रुग्ण, नमुना तपासणीसाठी पाठवला पुण्याला

Archana Banage

केएसएचे माजी अध्यक्ष सरदार मोमीन यांचे निधन

Archana Banage

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar