Tarun Bharat

डेबरामध्ये 2 माजी पोलीस अधिकाऱयांमध्ये लढत

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यातील 30 मतदारसंघांमध्ये 171 उमेदवार उभे राहिले आहेत. दुसऱया टप्प्यात नंदीग्रामसह अनेक महत्त्वाचे मतदारसंघ असून तेथील घडामोडींवर लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. पश्चिम मिदनापूर जिल्हय़ातील डेबरा विधानसभा मतदारसंघात दोन माजी आयपीएस अधिकारी आमने-सामने आहेत. भाजपने माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांना उमेदवारी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने माजी आयपीएस अधिकारी हुमायूं कबीर यांना संधी दिली आहे. या दोघांनीही यापूर्वी सीआयडीत परस्परांसोबत काम केले आहे. पण आता निवडणुकीच्या रणागंणात परस्परांना मात देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भारती घोष यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आयपीएसच्या नोकरीचा राजीनामा देत राजकारणात पाऊल ठेवले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत घाटाल मतदारसंघात त्या भाजपच्या उमेदवार होत्या. पण त्यांना विजय मिळू शकला नव्हता. घोष यांनी आता विधानसभा निवडणुकीत भाग घेतला आहे. तर हुमायूं कबीर यांनी अलिकडेच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

कबीर यांनी काही महिन्यांपूर्वी हुगळी पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देण्यासह आयपीएसच्या पदाचाही त्याग केला होता. तृणमूल काँग्रेसने त्यांना डेबरा येथील आमदाराचे तिकीट कापून उमेदवारी दिली आहे. भारती घोष यांना घाटाळ लोकसभा मतदारसंघात टॉलिवूड अभिनेता देव अधिकारी यांच्याविरोधात विजय मिळविता आला नव्हता. पण डेबरा विधानसभा मतदारसंघात त्यांना मताधिक्य मिळाले होते.

डेबरा मतदारसंघावर तृणमूल काँग्रेसचा दहा वर्षांपासून कब्जा आहे. हा मतदारसंघ पूर्वी डाव्या पक्षांचा बालेकिल्ला होता. पण 2011 च्या ममता बॅनर्जींच्या लाटेत तृणमूलने येथे विजय मिळविला होता. तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत ममतांचा पक्ष नवा उमेदवार देऊन विजय प्राप्त करत आला आहे. 2011 च्या निवडणुकीत तृणमूलचे राधाकांत यांनी यश मिळविले होते. तर 2016 च्या निवडणुकीत तृणमूलच्या सोलिमा खातून यांनी विजय प्राप्त केला होता.

Related Stories

Nobel Prize 2022: अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर ; ‘या’ तीन अर्थशास्त्रज्ञांना मिळालं अर्थशास्त्राचे नोबेल

Archana Banage

लुधियाणा सत्र न्यायालयात स्फोट, 2 जणांचा मृत्यू

Abhijeet Khandekar

अकाली दलाला झटका, सिरसा यांचा भाजपप्रवेश

Patil_p

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त

Patil_p

पंजाबमध्ये 300 युनिट वीज मोफत!

Patil_p

खर्गे विरुद्ध थरुर लढत

Patil_p