Tarun Bharat

‘डेल्टा’विरोधात फायझर, मॉडर्नाचा प्रभाव कमी

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनकडून सर्वात आधी मान्यता दिलेल्या फायझर आणि मॉडर्ना या लसींची डेल्टा व्हेरिएंटविरोधातील परिणामकारकता नुकतीच तपासण्यात आली. यामध्ये या दोन्ही लसींची प्रभावी क्षमता 91 टक्क्यांवरुन थेट 66 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. अमेरिकी आरोग्य कार्यकर्त्यांनी यासंदर्भात एक अहवाल प्रकाशित केला आहे.

अमेरिकेच्या यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनकडून फायझर आणि मॉडर्नाची लस घेतलेल्या नागरिकांवर होणाऱया प्रभावाची चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या निष्कर्षांवर पुन्हा संशोधन करण्यात आले. 14 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासात फायझर आणि मॉडर्नाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना डेल्टा व्हेरिअंटविरोधात केवळ 66 टक्के सुरक्षा मिळत असल्याचे समोर आले. 14 डिसेंबर 2020 पासून 10 एप्रिल 2021 पर्यंतच्या अभ्यासात लसींची परिणामकारकता 91 टक्के इतकी नोंदविण्यात आली होती. ती परिणामकारकता आता कमी झाली आहे.

Related Stories

रशियात मिळाली 10 हजार वर्षे जुनी वस्ती

Patil_p

गांधींच्या चष्म्याला लिलावात मिळाले 2.55 कोटींचे मूल्य

Patil_p

युक्रेनमध्ये मारला गेला रशियाचा चॅम्पियन

Patil_p

कोरोना विषाणू नष्ट करणारी लस तयार

Patil_p

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा झपाटय़ाने प्रसार

Patil_p

चीनमधील अमेरिकन पत्रकारांची होणार हकालपट्टी

datta jadhav
error: Content is protected !!