ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू मंदावत आहे. असे असले तरीही दुसऱ्या बाजूला कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.


डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला 3 प्रश्न विचारले आहेत. यामध्ये त्यांनी विचारले की, डेल्टा प्लस व्हेरियंटची तपासणी आणि हे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग का होत नाही आहे?, डेल्टा प्लसवर लस किती प्रभावी आहे आणि याची पूर्ण माहिती कधी मिळेल? आणि तिसऱ्या लाटे दरम्यान यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय प्लॅन आहे?, असे प्रश्न राहूल गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.
दरम्यान, शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचा या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत हा प्रकार तिसऱ्या लाटेसाठी कारण ठरू शकतो, असे म्हटले आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील डेल्टा प्लस बाबत चिंता व्यक्त केली होती. वेगाने पसरत असलेला डेल्टा प्रकार आतापर्यंत 85 देशांमध्ये आढळला आहे.