Tarun Bharat

डेव्हलपमेंट स्टडीज एक नवखी वाट

विविध देशांच्या एकंदर सर्वच बाबतीतील अभ्यासाचा हा विषय आहे. त्यामुळे इतर देशांची माहिती आपल्याला बऱयापैकी असायला हवी. भारताचे इतर देशांशी दृढ संबंध प्रस्थापित झालेले आहेत. अलीकडच्या काळात रशियासह इतर देशांबरोबर विविध करारही झाले आहेत. वाढते परकीय संबंध भारतासाठी नव्या संधींची कवाडे खुली करत असतात. म्हणून आपल्याला इतर देशांकडेही खासं लक्ष देण्याची गरज असते. या शाखेंतर्गत समाजशास्त्र, राजकीय, संख्यात्मक ज्ञान, इतिहास, मानवशास्त्र, भूगोल, आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी आपल्याला माहिती करून घ्यावी लागते. इतर देशांमधील वातावरण, लोकसंख्या, आर्थिक विकास, अभियांत्रिकी विकास, पर्यावरणीय स्थिती, मानवी हक्क, मानवी सुरक्षा, औद्योगिकीकरण, आंतरराष्ट्रीय विकास, परप्रांतीयांचा अभ्यास, जनआरोग्य, सामाजिक धोरण, सामाजिक विकास, सामाजिक कार्य, शहरीकरण, महिलांचा अभ्यास अशा विविध संबंधीची माहिती जाणुन घेण्याची गरज असते. तसेच इतर देशांसंबंधीत सार्वजनिक संबंधांचाही विचार केला जातो. सोशल वर्कर म्हणून काम करताना त्या देशातील समाजातील वैयक्तिक गरजा जाणून उणीवा समजून त्यावर पर्याय सूचविण्याची जबाबदारी असते. संबंधीत देशाची संस्कृती, पुरातन वास्तुकला, इतिहास याविषयीची खूप माहिती करून घ्यावी लागते.

या क्षेत्रात यायचं असेल तर याच विषयात पदवी संपादन करता येते. याकरीता उमेदवाराने बारावीला 55 टक्के गुण घेतलेले असावेत. मास्टर्स अभ्यासक्रम करायचा झाल्यास त्याकरीता प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून मिळू शकतो. डेव्हलपमेंट स्टडीज या विषयात मास्टर्स पदवी संपादन करून अनेकजण संशोधन, प्रशासन आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रांचा रस्ता पकडतात. संयुक्त राष्ट्र, जागतिक बँक, संशोधन संस्था/विद्यापीठ, सोशल कॉर्पोरेट कंपन्या, खासगी क्षेत्रातील सल्लागार, शाळा, महाविद्यालये, बिगरसरकारी संघटना आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. पब्लिक पॉलीसी कन्सल्टंट, सोशल वर्कर, टीचर, रिसर्चर, प्रोजेक्ट मॅनेजर, ऍडमिनीस्ट्रेटर अशा विविध पदांवर राहून करिअर घडवण्याची संधी असते.

गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रसह बारावी उत्तीर्ण केल्यानंतर डेव्हलपमेंट स्टडीज विषयात इंटिग्रेटेड मास्टर्स प्रोग्रॅम करता येतो. आयआयटी, मद्रास संस्था डेव्हलपमेंट स्टडीज विषयात इंटिग्रेटेड मास्टर्स प्रोग्रॅम आयोजीत करते. जिथे प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध होते. सोशल सायन्स आणि हय़ुमॅनिटीज किंवा इतर संबंधीत विषयात पदवी प्राप्त केलेल्यांना डेव्हलपमेंट स्टडीज शाखेत एमए करता येतं. याच विषयात मास्टर्स, एमबीए, एमफील, पीएचडी करण्याचा पर्याय पुढे असतो.

काही महत्त्वाच्या संस्था

 सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज, त्रिवेंद्रम

 टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई

 मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, चेन्नई

 इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, मुंबई

 ख्रिस्ट यूनिव्हर्सिटी, बेंगळूर

 दिल्ली विद्यापीठ, दिल्ली

 आंबेडकर यूनिव्हर्सिटी, आग्रा

 जामीया मिलीया इस्लामिया, दिल्ली

 परदेशातील संस्था-

 हार्वर्ड यूनिव्हर्सिटी, अमेरिका

 ससेक्स यूनिव्हर्सिटी, इंग्लंड

 यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया

 यूनिव्हर्सिटी ऑफ केपटाऊन

 यूनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो

 यूनिव्हर्सिटी ऑफ टोकीयो

 स्टँडफोर्ड यूनिव्हर्सिटी

Related Stories

बेडरूम

Patil_p

शाळांजवळच्या घरांना मागणी

Patil_p

गृहसजावटीचा बदलता अंदाज

Patil_p

भावनांपेक्षा भाववाढीकडे लक्ष द्या!

Patil_p

झगमगती दुबई

Patil_p

मल्लू

Patil_p