Tarun Bharat

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा – सर्बिया, स्पेन विजयी, इटली आघाडीवर

वृत्त संस्था/ इनेसब्रुक

डेव्हिस चषक अंतिम टेनिस स्पर्धेच्या शुक्रवारी येथे झालेल्या फ गटातील लढतीत सर्बियाने यजमान ऑस्ट्रियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला तर या स्पर्धेतील अन्य लढतीमध्ये इटलीने अमेरिकेवर 2-0 आघाडी घेतली असून स्पेनने इक्वेडोरवर 3-0 अशी मात केली.

फ गटातील सर्बिया-ऑस्ट्रिया यांच्यातील लढतीत सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचने ऑस्ट्रियाच्या नोव्हॅकचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपल्या संघाला निर्विवाद विजय मिळवून दिला. दुसऱया एकेरी सामन्यात सर्बियाच्या लेजोव्हिकने ऑस्ट्रियाच्या मेल्झरचा 7-6 (7-5), 3-6, 7-5 असा पराभव केला. दुहेरीच्या सामन्यात सर्बियाच्या कॅसिक आणि क्रेजोनोव्हिक यांनी ऑस्ट्रियाच्या मॅरेच-ओस्वाल्ड यांच्यावर 7-6 (7-4) 4-6, 6-3 अशी मात करत ऑस्ट्रियाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.

टय़ुरिनमध्ये ई गटातील सुरू असलेल्या लढतीत यजमान इटलीने अमेरिकेवर 2-0 अशी आघाडी मिळविली. या लढतीतील पहिल्या एकेरीच्या सामन्यात इटलीच्या सोनेगोने अमेरिकेच्या ओपेलकाचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरने अमेरिकेच्या जॉन इस्नेरचे आव्हान 6-2, 6-0 असे संपुष्टात आणत संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली.

माद्रिदमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या एका लढतीत स्पेनने इक्वेडोरवर 3-0 अशी एकतर्फी मात केली. पहिल्या एकेरी सामन्यात स्पेनच्या लोपेझने इक्वेडोरचा क्विरोजचा 6-3, 6-3 असा पराभव केला. दुसऱया एकेरी सामन्यात स्पेनच्या बुस्टाने इक्वेडोरच्या गोमेझवर 5-7, 6-3, 7-6 (7-5) असा पराभव केला. दुहेरीच्या सामन्यात स्पेनच्या बुस्टा-ग्रेनोलर्स यांनी इक्वेडोरच्या इस्कोबारö हिडाल्गोचा 6-4, 6-7 (5-7), 7-6 (7-2) असा पराभव करत डेव्हिस चषक स्पर्धेत प्रथमच खेळणाऱया इक्वेडोरचे आव्हान संपुष्टात आणले.

Related Stories

बार्सिलोनाकडे कोपा डेल रे फुटबॉल चषक

Patil_p

निवड चाचणी स्पर्धेत ऐश्वर्य तोमर विजेता

Amit Kulkarni

रिषभ पंत, शार्दुलला 100 टक्के दंड, आमरे निलंबित

Patil_p

रणजी स्पर्धेच्या ड्रॉ मध्ये मुंबई, कर्नाटक, दिल्ली एकाच गटात

Patil_p

मुंबईला पराभवाची परतफेड करण्याची संधी

Patil_p

सत्यवर्त, सुमित उपांत्यपूर्व फेरीत, धनकर पराभूत

Amit Kulkarni