Tarun Bharat

डेव्हिस चषक स्पर्धेत भारताची लढत नॉर्वेशी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत यजमान भारताची आगामी विश्वगट-1 मधील लढत नॉर्वेबरोबर होणार आहे. दरम्यान, या लढतीवेळी आशियाई क्रीडा स्पर्धा होत असल्याने सदर लढतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचा गुरुवारी ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉनुसार भारताचा विश्वगट-1 मधील सामना नॉर्वेबरोबर निश्चित झाला आहे. सदरची लढत 16-17 किंवा 17-18 सप्टेंबरला निश्चित करण्याचा विचार चालू आहे. याच कालावधीत म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धा भरविली जात आहे. ही स्पर्धा 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. भारत आणि नॉर्वे यांच्यातील ही आगामी डेव्हिस चषक लढत नॉर्वेमध्ये होणार आहे. या लढतीसाठी भारतीय डेव्हिस चषक संघातील खेळाडूंना नॉर्वेमध्ये दाखल होणे अवघड ठरेल. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचा सहभाग निश्चित असला तरी या दोन्ही स्पर्धांच्या तारखा एकाचवेळी येत असल्याने भारतासमोर मोठे पेच निर्माण होईल, असे अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या विश्वगट-1 मध्ये पाक, उझ्बेकिस्तान, जपान, भारत तर विश्वगट-2 मध्ये चीन, लेबनॉन, थायलंड, चीन तैपेई, हाँगकाँग आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. या संघातील डेव्हिस चषक लढती या वषीच्या सप्टेंबरमध्ये खेळविल्या जाणार आहेत. दरम्यान, कोरिया आणि कझाकस्तान यांचाही डेव्हिस चषक स्पर्धेत सहभाग असेल.

Related Stories

एफआयएच समिती सदस्यपदी श्रीजेश

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आजपासून

Omkar B

आफ्रिदीच्या सर्वोत्तम संघात सचिन, लाराला स्थान नाही

Patil_p

विश्वचषक हॉकी स्पर्धा लोगोचे अनावरण

Patil_p

यशस्वी प्रशिक्षक होण्यासाठी अनुभवाची गरज नाही

Patil_p

धोनीच्या टीम इंडियातील कमबॅकबाबत गांगुली म्हणतो..

Archana Banage
error: Content is protected !!