Tarun Bharat

डे-नाईट कसोटीला 27 हजार प्रेक्षकांना परवानगी

Advertisements

वृत्तसंस्था/ सिडनी

भारतीय क्रिकेट संघ चालू महिन्याच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येणार असून या मालिकेतील ऍडलेड ओव्हलचा सामना दिवस-रात्रीचा होणार आहे. या सामन्यासाठी स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के शौकिनांना म्हणजेच सुमारे 27 हजार प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना महामारी समस्येमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोना महामारी समस्येमुळे सध्या विविध देशांमध्ये जैव सुरक्षित वातावरणात प्रेक्षकविना स्टेडियममध्ये क्रिकेट सामने खेळविले जात आहेत. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या आगामी मालिकेसाठी क्रिकेट शौकिनांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही प्रमाणात प्रेक्षकांना उपस्थित राहण्याकरिता ऑस्ट्रेलियन शासनाच्या मान्यतेने अधिकृत परवानगी देण्याचे धाडस केले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱयात भारतीय संघ चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयाला 27 नोव्हेंबरपासून सिडनीतील पहिल्या वनडे सामन्याने प्रारंभ होईल. कसोटी मालिकेला ऍडलेड ओव्हलमध्ये 17 डिसेंबरपासून प्रारंभ केला जाणार असून ही पहिली कसोटी दिवस-रात्रीची खेळविली जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. ऍडलेड ओव्हल स्टेडियमची क्षमता 54 हजार प्रेक्षकांची असून कोरोना महामारीच्या भीतीने केवळ क्षमतेच्या 50 टक्के म्हणजे प्रत्येकी दिवशी 27 हजार प्रेक्षकांसाठी तिकीटे उपलब्ध करून देण्यात येतील. ऍडलेडच्या कसोटीत गुलाबी चेंडू वापरला जाणार असून या सामन्यात कोहली कर्णधार म्हणून राहील. या सामन्यानंतर कोहली मायदेशी परतणार असून तो या मालिकेतील शेवटच्या तीन कसोटीसाठी उपलब्ध होवू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणारा हा पहिला कसोटी सामना आहे. यापूर्वी ऍडलेडमध्ये दिवस-रात्रीच्या चार दिवसांच्या कसोटी सामन्याचे यजमानपद ऑस्ट्रेलियाने भूषविले होते. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघाने 2019 साली बांगलादेश विरूद्ध यापूर्वी दिवस-रात्रीचा सामना खेळला होता.

26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणाऱया मेलबोर्नच्या मैदानावरील बॉक्सिंग डे कसोटीसाठी व्हिक्टोरियन शासनाने स्टेडियमच्या क्षमतेच्या तुलनेत 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे तर या मालिकेतील ब्रिस्बेनमधील चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी 30 हजार शौकिनांना परवानगीची अपेक्षा बाळगली जात आहे. मेलबोर्नच्या कसोटीत प्रत्येक दिवशी 25 हजार प्रेक्षकांना तिकीटे उपलब्ध करून दिली जातील. या मालिकेतील दुसरी कसोटी सिडनीमध्ये होणार असून या सामन्याकरिता प्रत्येक दिवशी 23 हजार प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी मिळाली आहे. उभय संघातील ही तिसरी व्होडाफोन कसोटी मालिका राहील.

Related Stories

फ्रेंच स्पर्धेतील विजेती स्वायटेक क्वारंटाईनमध्ये

Patil_p

कौंटी सिलेक्ट संघाचे नेतृत्व ऱहोड्सकडे

Patil_p

हॅलेप, सेरेना, जोकोविच, व्हेरेव्ह चौथ्या फेरीत

Patil_p

मर्सिडीजच्या हॅमिल्टनचे 100 वे जेतेपद

Patil_p

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डीआरएसचे पदार्पण

Patil_p

शेफिल्ड शील्ड लढत कोरोनामुळे लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!