Tarun Bharat

डॉक्टरांसोबत गैरवर्तन आता दयायाचना

देश तसेच जगात कोरोना विषाणूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. भारतात रुग्णांची संख्या 6 हजारनजीक पोहोचली आहे. तर उत्तरप्रदेशात 400 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कानपूर जिल्हय़ात तबलिगी जमातशी संबंधित 3 जणांना हॅलेट रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रारंभी हे तिन्ही रुग्ण डॉक्टरांना सहकार्य करत नसल्याचे आरोग्य कर्मचाऱयांसोबत गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. कथितरित्या या तबलिगीच्या सदस्यांनी डॉक्टरांनी थुंकण्याचा प्रकार केला होता.

पण तबलिगीच्या या सदस्यांची प्रकृती बिघडू लागल्यावर ते वैद्यकीय कर्मचाऱयांसमोर हमसून रडू लागले आहेत. या लोकांनी आरोग्य कर्मचाऱयांसमोर दयायाचना करत जीव वाचविण्याची विनंती चालविली आहे.

रुग्णालयात दाखल तबलिगच्या सदस्यांना आता स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आहे. या रुग्णांच्या वर्तनाता आता बदल दिसून येत आहे. तबलिगचे सदस्य आता औषधांचे सेवन करण्यास तयार झाल्याची माहिती लाला लाजपत राय रुग्णालयाच्या प्रमुख आरती लालचंदानी यांनी दिली आहे.

कानपूर जिल्हय़ात रुग्ण सापडले असून यातील एक जण पूर्णपणे बरा झाला आहे. जिल्हय़ात सुमारे 3 हजार जणांनी पलायन केले असून त्या सर्वांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे. जिल्हय़ात प्रत्येक व्यक्तीवर बारीक नजर ठेवली जात आहे. याप्रकरणी स्थानिकांचे सहकार्य मिळत आहे. सर्वांनी अत्यंत सजगता तसेच सुरक्षेसह रहावे असे आवाहन कानपूरचे जिल्हाधिकारी ब्रह्मदेव राम तिवारी यांनी केले आहे.

उत्तरप्रदेशात एकूण रुग्णांची संख्या आता 400 पेक्षा अधिक झाली आहे. या रुग्णांच्या संख्येत तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे संसर्ग झालेल्या लोकांची मोठी संख्या आहे. तबलिगच्या कार्यक्रमात भाग घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तपास केला जात असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

Related Stories

काँग्रेसमध्ये नेतृत्वाचे संकट नाही

Omkar B

…तर दिल्लीत निवडून आलेले सरकार का?

Patil_p

डेव्हलपरला टायपिंग मिस्टेक पडली भारी

Patil_p

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, 2 दहशतवाद्यांना अटक

datta jadhav

अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड

Patil_p

यूपी बोर्डाकडून परीक्षांची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी सुरू होणार 10वी,12 वीची परीक्षा

Tousif Mujawar