Tarun Bharat

डीजेचा ठेका अन् सामूहिक विसर्जन

चिकोडीतील मंडळांचा निर्णय : शहरासह परिसरातील शंभरहून अधिक मूर्तींचा सहभाग : पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग

प्रतिनिधी /चिकोडी

डीजेचा ठेका अन् सामूहिकरित्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला निरोप देण्याचा निर्णय चिकोडीसह परिसरातील मंडळांनी घेतला. त्याला नगरपरिषद व सामाजिक संस्थांच्यावतीने दुजोरा मिळाला. त्यामुळे चिकोडीसह हालट्टी, डंबळ प्लॉट, राजीव नगर, महावीर नगर, इंदिरा नगर, कवटगीमठ नगर, संजय नगर, होसपेट गल्ली, करनूर गल्ली, रविवार पेठ, गुरुवारपेठ, गणपतीपेठ या भागातील शंभरहून अधिक मंडळांच्या श्रीमूर्तींचे विसर्जन एकाचवेळी करण्यात आले. त्यासाठी शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्यात प्रामुख्याने महिलांचा सहभाग मोठा होता.

प्रारंभी संपादना स्वामीजी, अल्लमप्रभू स्वामीजी, कर्नाटकराज्य सौहार्दचे उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ, नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. या मिरवणुकीचा शुभारंभ आरडी महाविद्यालयाच्या पटांगणावरुन करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतात, नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करुन कृत्य करुन नये. याशिवाय कोरोना संक्रमणाविषयी जागृत राहून मास्क वापरण्यात यावे. मिरवणुकीला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. पोलिस प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

यावेळी पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच डीजेचा वापर करण्यात आल्याने केईबीकडून कर्मचारी नेमण्यात आले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करुन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. मुंबईच्या धरतीवर चिकोडी शहरातून सदर मिरवणूक काढण्यात आली. बेळगाव जिल्हयातील अन्य शहरांनी सार्वजनिक मिरवणुकीच्या माध्यमातून चांगला संदेश द्यावा अशी चर्चा सुरु होती. रात्री उशिरा अंकली येथील कृष्णा नदीत मूर्तीचा कार्यक्रम पार पडला.

Related Stories

सिद्धिविनायक देवस्थानकडून मुख्यमंत्री रीलिफ फंडला 51 हजार

Patil_p

मनपा कर्मचाऱयांकडील जबाबदाऱयांमध्ये बदल

Amit Kulkarni

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याने मानले आभार

Patil_p

विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू

Amit Kulkarni

मराठा बँकेतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

Rohit Salunke

बुधवारी जिल्हय़ात 57 नवे रुग्ण

Amit Kulkarni