Tarun Bharat

डॉ. आंबेडकर आधुनिक भारताचे पितामह

मुख्यमंत्री बोम्माई यांचे गौरवोद्गार : बस्तवाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ाचे अनावरण

प्रतिनिधी /बेळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे पितामह आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काढले. शुक्रवारी सुवर्ण विधानसौधजवळील बस्तवाड येथे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळय़ाचे अनावरण करून ते बोलत होते.

आम्ही केवळ मतदान करून चालत नाही. मतदान केल्यानंतर अस्तित्वात आलेली व्यवस्था लोकाभिमुख आहे का? हे पाहणे लोकप्रतिनिधींबरोबरच सर्वसामान्य जनतेचेही कर्तव्य आहे. तसे झाले तरच देश समृद्ध होणार आहे. हीच बाबासाहेबांची इच्छाही होती. त्यांच्या विचारानुसारच संविधानाच्या माध्यमातून आमची प्रशासकीय व्यवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुमचा धर्मग्रंथ कोणता? असे विचारले तर संविधान हाच धर्मग्रंथ आहे, असे ते आदराने सांगतात. त्यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून आपली वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गोविंद कार्जोळ, आमदार बसवराज मत्तीमुड, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते.

संपूर्ण जगाला आदर्शवत अशी घटना

बाबासाहेबांमुळे आम्ही आज विधिमंडळात काम करतो. भारतीय घटनेची रचना झाली नसती, देश प्रजासत्ताक झाला नसता तर देशात लोकशाही नांदली नसती. कायदा व सुव्यवस्था, शांतता राहिली नसती. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान उत्कृष्ट आहे. विविध देशांच्या संविधानापेक्षाही अधिक लोकाभिमुख मानवीय गुणांनी युक्त व देश एकसंध ठेवणारी आहे. संपूर्ण जगाला आदर्श अशी आमची घटना आहे, असेही बसवराज बोम्माई यांनी सांगितले.

Related Stories

जिल्हय़ात वसती योजनेतील 7114 पैकी 191 घरांची कामे पूर्ण

Amit Kulkarni

विनय मांगलेकर वॉरियर्स-बारूदवाले बुमर्स संयुक्त विजेते

Amit Kulkarni

ता.पं.कार्यालयासमोर पार्किंग ठरतेय डोकेदुखी

Amit Kulkarni

जिल्हय़ात तोतया पत्रकार अन् पोलिसांचा सुळसुळाट

Amit Kulkarni

लोंढा येथे पती-पत्नीचे निधन

Patil_p

भारताची फिडे ऑनलाईन ऑलिम्पियाड फायनलमध्ये धडक

Patil_p