Tarun Bharat

डॉ. आंबेडकर निगम मंडळ अध्यक्षांची बेळगाव भेट

भेटीनिमित्त चलवादी महासभेच्यावतीने सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निगम मंडळाचे चेअरमन माजी मंत्री एच. नागेश यांनी सुवर्णसौधला भेट दिली. यावेळी त्यांनी निगम मंडळाच्या कार्याची चौकशी करुन माहिती घेतली. ते बेळगावला आल्याची माहिती चलवादी महासभेला मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुवर्णसौध येथे जाऊन त्यांचा सत्कार केला.

बेळगाव जिल्हा निगम मंडळाची चौकशी केली. बेळगाव जिल्हा हा मोठा जिल्हा असून या जिह्यात मोठय़ा प्रमाणात दलित कुटुंबे राहतात. त्यांच्यापर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा, सरकारकडून मिळणारे अनुदान त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्या दृष्टिने पाऊल उचला, असे त्यांनी येथील अधिकाऱयांना सांगितले.

यावेळी चलवादी महासभेचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश मेत्री, दयानंद केरुरे, दीपक मेत्री, धनपाल अक्षीमनी, संजय कोलकार, पारीस कोलकार, कुमार दरबारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

कडोली साहित्य संमेलन 10 रोजी साधेपणाने होणार

Patil_p

विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रितम कानिटकर उपविजेता

Amit Kulkarni

काकती येथील ‘स्पाईसी ब्लेन्ड्स’ रेस्टॉरंटचा 18 रोजी शुभारंभ

Amit Kulkarni

हुबळी-दादर रेल्वे पाच दिवस रद्द

Patil_p

टोळक्याकडून कामगाराला मारहाण

Amit Kulkarni

बेळगावच्या आदित्यचा लेह-लडाख प्रवास

Amit Kulkarni