Tarun Bharat

डॉ. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड

वार्ताहर / पाचगाव

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस ही राज्यातील नामांकित संस्था असून फेलोच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यातील तसेच राज्याबाहेरील शास्त्रज्ञांचा त्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाच्या कामगिरीच्या आधारे निवड केली जाते. या यादीमध्ये सन २०२० या वर्षासाठी शिवाजी विद्यापीठातून प्रा. गरडकर यांची एकमेव निवड झाली आहे.

प्रा. गरडकर हे नॅनोमटेरिअल्स या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी पाण्यातील रंगद्रव्यांचे विघटन सूर्यप्रकाशाच्या मदतीने करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही रंगद्रव्य फक्त अर्ध्यातासामध्ये जवळपास ९५% नष्ट केली आहेत. तसेच त्यांची राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्तरावर एकूण १५० शोधपत्रिका प्रकशित झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी मिळाली असून सध्या ८ विद्यार्थी नॅनोमटेरिअल्स या विषयावर कार्य करीत आहेत. सध्या ते डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

प्रा. गरडकर यांना संशोधनासाठी भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीची २०१८ सालीची शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. तसेच ते अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या संपादकीय मंडळात संपादक व परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कामातील तत्परता पाहून अमेरिकन केमिकल सोसायटी सारख्या अनेक नामवंत प्रकाशकांनी त्यांना उत्कृष्ट परीक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. संशोधनातील उत्तम गुणवत्ता मूल्यांकन हे एच इंडेक्स, आय-१० इंडेक्स, व सायटेशन यांच्या आधारे केले जाते. त्यानुसार प्रा. गरडकर यांच्या संशोधनाचा एच इंडेक्स ३५ , आय-१० इंडेक्स ८५, व सायटेशन्स ३७०० इतकी आहेत.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात 41 कोरोनामुक्त तर 30 नवे रूग्ण

Archana Banage

‘वारणा दूध संघास बिहारला मिल्क मिक्स कॉन्सनट्रेट दूध पुरवठा करण्याची ऑर्डर’

Archana Banage

काँग्रेसची भारत जोडोची हवा, जिल्ह्यात कायम राहणार का भावा

Archana Banage

पवारांनी पेरलं तेच उगवलं!

Archana Banage

दसऱ्यानंतर स्वराज्य संघटनेचा राज्यभर दौरा; संभाजीराजेंची माहिती

Archana Banage