Tarun Bharat

डॉ. के. के. सिजोरिया यांना जीवनगौरव सुश्रुत पुरस्कार जाहीर

ऑनलाईन टीम  / पुणे  : 

 डॉ. पाईल्स क्लिनिकतर्फे सुश्रुत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोंढवा-कात्रज रस्त्यावरील इस्कॉन टेम्पल येथे होणार आहे. डॉ. के. के. सिजोरिया (ग्वाल्हेर), डॉ. महेश संघवी (मुंबई), डॉ. नंदकिशोर बोरसे (पुणे), वैद्य अश्वीन बरोत (लंडन) यांना जीवन गौरव सुश्रुत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. रमेश घोडके (बीड), डॉ. हेमंत इंगळे (नांदेड), डॉ. राजेंद्र झोल (औरंगाबाद) यांना सुश्रुत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती मूळव्याध तज्ज्ञ डॉ. कुणाल कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
डॉ. कुणाल कामठे म्हणाले, डॉ. आलोक गुप्ता (यवतमाळ), डॉ. भरत ओझा (पुणे) यांना एक्स्ट्रॉआॅर्डिनरी वर्क इन प्रोक्टोलॉजी या पुरस्काराने तर डॉ. सुर्यकिरण वाघ (कोल्हापूर), डॉ. वीणा देव (नागपूर), डॉ. हरीष पाटणकर (पुणे) यांना आयुर्वेद आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. इस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णनामदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 
मूळव्याधमुक्त भारत हा उद्देश ठेवून मूळव्याधग्रस्त रुग्णांच्या मेळाव्याचे आयोजन रविवार, दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता इस्कॉन टेम्पल येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने मूळव्याधग्रस्त रुग्ण सहभागी होणार आहेत. मूळव्याध तज्ज्ञ डॉ. कुणाल कामठे यावेळी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. 

Related Stories

सोलापूर : तिसऱ्या टप्प्यात 7 लाख जणांना मिळणार लस

Archana Banage

परतीच्या पावसात वाहून गेलेल्या स्विफ्टचा पोलिसांनी लावला छडा

Archana Banage

युवकाची राहत्या घरी फेट्याने गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Khandekar

करमाळ्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Abhijeet Khandekar

Sangli; जत तालुक्यातील कुडणुरात दुसऱ्यांदा सापडला हॅंडग्रेनेड बॉम्ब

Abhijeet Khandekar

अशा ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

Archana Banage