Tarun Bharat

डॉ. गुरुदास नाटेकर यांना “राष्ट्रीय निर्माण रत्न” पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी / म्हापसा

 नवी दिल्ली येथील इंटलेक्च्युअल पीपल्स फॉउंडेशन या प्रतिष्ठित संस्थेचा  “राष्ट्रीय निर्माण रत्न” पुरस्कार गोमंतकातील प्रसिद्ध उद्योजक आणि शिक्षणतज्ञ डॉ. गुरुदास नाटेकर यांना प्रदान करण्यात आला. डॉ. नाटेकर यांना हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी देण्यात आला आहे.

इंटलेक्च्युअल पीपल्स फॉउंडेशन (आय.पी.एफ.) या संस्थेतर्फे देशभरातून होणाऱया स्तुत्य कर्तृत्वांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते.  फाउंडेशन हा सोहळा  राष्ट्रीय पातळीवर आयोजित करतो आणि भारतातील सामाजिक कार्यासाठी आणि शाश्वत विकासास प्रोत्साहन देते.

डॉ. नाटेकर यांचे हल्लीच 18वे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून, त्याच्या ” एक वादळ घोंगावताना ” या मराठी कादंबरीवर आधारित त्यांनी ” रणसांवट ” या कोकणी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 50व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड होऊन, प्रदर्शित करण्यात आता होता.

आजवर सामाजिक, साहित्य, उद्योग, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात  त्यांनी दिलेल्या योगदानासाठी  200 हुन अधिक सत्कार केले गेले आहेत. त्यांनी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त संस्थां®ाs अध्यक्षपद भूषविले आहे/भूषवित आहेत. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर त्यांनी ज्ञानप्रसारक मंडळाच्या केजीपासून पीजीपर्यंत शिक्षण देणाऱया संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. सहकार क्षेत्रातील म्हापसा अर्बन कॉ-ऑप बँकेचे ते माजी अध्यक्ष होते.  ते 175 हुन अधिक संस्थांशी संबंधित आहेत. म्हापश्यातील न्यू गोवा एज्युकेशनल ट्रस्ट संचालित जी. एस. आमोणकर विद्यामंदिरचे ते ट्रस्टी आहेत. त्यांचे दोन संशोधनात्मक प्रबंध प्रकाशित झालेले आहे. राजकारणामध्ये ते सक्रिय असून, म्हापश्यात काँग्रेस पक्षाचे ते सर्वात तरुण उमेदवार होते.

Related Stories

गणितात गोवा पडतोय मागे

Amit Kulkarni

काँग्रेस आमदार फोडीसाठी तीनशे कोटांचा व्यवहार

Omkar B

भाजपला लोक पराभूत करतील

Amit Kulkarni

आय-लीगमध्ये मोहम्मेडन स्पोर्टिंग पराभूत; एजॉल-सुदेवा बरोबरीत

Amit Kulkarni

नागरिकत्व कायदय़ाच्या अमलबजावणीसाठी जनतेकडून व्यापक पाठींबा- माविन गुदिन्हो

Patil_p

पणजीत 10 रोजी गुणीरंग संगीत महोत्सव

Amit Kulkarni