Tarun Bharat

डॉ. डि. टी. शिर्के शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु

13 व्या कुलगुरु पदी नियुक्ती, कोल्हापूरच्या सुपुत्राचा बहुमान

प्रतिनिधी / कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या 13 व्या कुलगुरुपदी विद्यापीठातील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के तथा डी. टी. शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. 6) सायंकाळी डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. आगामी पाच वर्षासाठी डॉ. शिर्के यांची कुलगुरु पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ दिनांक 17 जून रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. तत्कालीन कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या पदाचा कार्यकाल 17 जून रोजी संपला. त्यानंतर कुलपती कार्यालायाकडून त्रिसदस्यीय शोध समिती नेमली. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, बेंगलोर, जेएनयू विद्यापीठातील प्राध्यापक, प्र. कुलगुरु संशोधक अशा 169 उमेदवारांनी अर्ज केले होते. यातून 25 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली होती. या उमेदवारांपैकी 5 उमेदवारांची नावे शोध समितीकडून बंद पाकीटातून कुलपती कार्यालयाकडे दिली. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, एन. एम. आय. एम. आयचे अधिष्ठाता डॉ. नितीन देसाई, प्रा. डॉ. अंजली कुरणे, प्रा. डॉ. के. व्ही. काळे, प्रा. डॉ. अविनाश कुंभार या पाच जणांची नावे अंतिम यादीमध्ये होती.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. अश्विनी कुमार नांगिया आणि राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर अशी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. सोमवारी या समितीने अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी डॉ. डी. टी. शिर्के यांच्या नावाची घोषणा केली.

डॉ. दिगंबर तुकाराम तथा डी. टी. शिर्के
वाठार तर्फे वडगांव (ता. हातकणंगले), जन्मतारीख 11 जून 1965, शिक्षण एमएसस्सी (संख्याशास्त्र) एमफील, पी. एचडी, सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये संख्याशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत, विविध पदांवर काम, प्र. कुलगुरु, कुलसचिव, संख्याशास्त्र विभागप्रमुख, अधिसभेसह विविध अधिकार मंडळांवर काम केले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनुभव 33 वर्षे

कुलगुरु पदासाठीच्या अंतिम पाच उमेदवारांमध्ये पहिल्यांदाच निवड आणि पहिल्यांदाच बाजी. शिवाजी विद्यापीठाला समृद्ध शैक्षणिक वारसा लाभला आहे. हा वारसा वृद्धिंगत करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.

Related Stories

राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिकांच्या नावाची चर्चा

Archana Banage

कोल्हापूर : कोरोना कमी झाला…गेलेला नाही !

Archana Banage

पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या विरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा दाखल

Archana Banage

उद्धवजींना सल्ला देण्याची वेळ निघून गेली

Abhijeet Khandekar

गाव, वॉर्डनिहाय शिवसंपर्क अभियान राबवा; संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर

Archana Banage

सातारा तालुक्यात सहा जणांना कोरोनाची बाधा

Archana Banage