Tarun Bharat

डॉ. दत्तगुरु आमोणकर यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या क्षेत्रिय संचालकपदी नियुक्ती

प्रतिनिधी /पणजी

डॉ. दत्तगुरु आमोणकर यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या (इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस्) गोवा रिजनल सेंटरचे क्षेत्रिय संचालक (रिजनल डायरेक्टर) म्हणून नियुक्ती झाली असून त्यानी या पदाचा ताबा घेतला आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली स्वायत्त संस्था असून विविध कला प्रकारांचे सादरीकरण, संशोधन, संवर्धन, दस्तऐवजीकरण, प्रकाशन इत्यादी विविध विषयांच्या पैलूवर कार्यरत आहे. सदर संस्थेची भारतात एकूण 9 (नऊ) क्षेत्रिय केंदे असून गोवा हे नववे केंद्र आहे. हल्लीच डिसेंबर 2021 मद्ये रविंद्र भवन, सांखळी येथे केंद्रीय संस्कृती मंत्री श्री. जी. किशन रेड्डी व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व मान्यवरांच्यया उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन झाले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नाने हे केंद्र रविंद्र भवन, सांखळी येथून कार्यरत होत आहे.

डॉ. दत्तगुरु आमोणकर यांची या पदावर निवड मुलाखतीद्वारे झाली असून या पदावर नियुक्त होणारे ते पहिले गोमंतकीय अधिकारी ठरले आहेत. कला अकादमी गोवाचे कार्यक्रम व विकास अधिकारी म्हणून कार्यक्रम आयोजनाचा दीर्घ अनुभव, राष्ट्रीय स्तरावरील कलाकारांशी असलेला उत्कृष्ट संपर्क, सांस्कृतिक इतिहास या विषयातील डॉक्टरेट इत्यादी जमेच्या बाजू त्यांच्या या पदावरील नियुक्तीस कारणीभूत ठरल्या. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर या विद्यापीठांचे इतिहास विषयावरील पी.एच.डी (डॉक्टरेट) साठीचे परिक्षक म्हणूनही ते काम पाहतात.

Related Stories

डोंगरीचे प्रसिद्ध इंत्रुज मेळ उत्साहात

Amit Kulkarni

पोलिसांवर गोळीबार करुन कैद्याचे पलायन

Omkar B

विजय हजारे स्पर्धेत आज गोव्याची सलामी बडोद्याशी

Amit Kulkarni

काणकोणातील बगलमार्गावर अपघातांची शृंखला चालूच

Amit Kulkarni

साखळीतील तीन भाग मायक्रो कंटेनमेंट झोन.

Patil_p

‘हाव्स बिल्डिंग ऍडव्हान्स’ योजना मागे घेतल्याने मानवी हक्काचा भंग नव्हे

Amit Kulkarni
error: Content is protected !!