Tarun Bharat

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मालिकेत राजगृह प्रवेश

Advertisements

स्टार प्रवाहवरील ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर‘ महामानवाची गौरवगाथा मालिकेत महत्वाचा ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे बाबासाहेबांचा दादर इथल्या राजगफहातील प्रवेश. ही वास्तू बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग. या वास्तूमधील त्यांचं वास्तव्य नेमकं कसं होतं हे पुन्हा एकदा मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना अनुभवता येईल. दीड महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर राजगफहाची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आलीय. कलादिग्दर्शक अजित दांडेकर यांनी राजगफहाचा हुबेहुब सेट उभारला आहे.

हा सेट उभारण्याआधी त्यांनी दादर इथल्या राजगफहाला प्रत्यक्ष भेट देऊन या ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास केला. राजगफहाची प्रतिकृती साकारणं हे खूप मोठं आव्हान होतं. स्टार प्रवाह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या संपूर्ण टीमने हे आव्हान पेलण्याचा निर्धार केला आणि ते प्रत्यक्षातही आणलं. बाबासाहेबांचे सुरुवातीचे दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली. आणि अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकील म्हणून ख्याती पसरली. 1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचं कार्यालय परळच्या दामोदर हघॅल जवळ होतं. घरी येणार्या जाणाऱयांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरं पडू लागलं होतं. पुस्तकांची आबाळ होत होती. म्हणून त्यांनी स्वत:साठी नवीन घर बांधण्याचा निश्चय केला. बाबासाहेबांनी स्वत:ची इमारत उभी करताना त्यात ग्रंथालय कसे असावे, याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला होता. परदेशात पाहिलेल्या उत्तमोत्तम ग्रंथालयांची वैशिष्टय़े आपल्याकडेही असावीत, असा प्रयत्न त्यांनी केला. त्या रचनेत तीनल्ल्तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स त्यांनी राजगफहाच्या तळमजल्यावर बांधून घेतले होते. त्या दोन ब्लॉक्समध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. राजगफहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ.बाबासाहेबांनी स्वतरूच्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वतरू आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या. इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम 1931 च्या जानेवारी महिन्यात सुरु झाले. सन 1933 मध्ये राजगफहाचं बांधकाम पूर्ण झाले आणि बाबासाहेब आपल्या कुटुंबीयांसह राजगफह या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूत राहण्यास आले.

बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेली ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे. इतिहासाच्या या पाऊलखुणा पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून अनुभवायला मिळणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

Related Stories

मातृत्वानंतर कल्कि कोचलिनला आले होते नैराश्य

Patil_p

चित्रपटांपासून दूर राहण्याचे भाग्यश्रीने सांगितले कारण

Patil_p

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा

Patil_p

उर्वशी रौतेलाला युएईचा गोल्डन व्हिसा

Patil_p

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन

Tousif Mujawar

हंसिका लवकरच करणार विवाह

Patil_p
error: Content is protected !!