Tarun Bharat

डॉ. विजय थोरात आज स्वीकारणार पदभार

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून सोमवारी पदभार स्वीकारणारे डॉ. विजय थोरात हे मुळचे पुणे जिह्यातील मंचरचे. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर जिह्यातील पन्हाळा, परभरणी, शिरुर आणि भोर या नगरपालिकेत काम केले आहे. जेथे जाईल तेथे त्यांनी वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे. भोर पालिकेला त्यांनी स्वच्छतेची वाट दाखवली. पन्हाळय़ात शिवस्मारक उभे केले. शिरुरमध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला. त्यावेळी त्यांच्यावर हल्लाही झाला. शिवप्रेमी असलेले डॉ. विजयराव थोरात यांच्याकडे सातारा पालिकेचा मुख्याधिकारी कार्यभार आला असून त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत.

बीएएमएस, एमबीए पुर्ण केल्यानंतर त्यांनी 2009 ला राज्य सेवेतून पहिली पोस्ट मुख्याधिकारी म्हणून परभणी जिह्यात पुर्णानगर पालिकेत मिळाली. तेथे त्यांनी अतिक्रमणांवर धडाकेबाज कारवाई केली. त्याच दरम्यान त्यांच्यावर गुंडांनी हल्लाही केला होता. परंतु त्यांनी धडाकेबाज कारवाई केली होती. त्यानंतर पन्हाळा येथे त्यांची बदली झाल्यानंतर ते शिवस्मारक उभे केले. तेथून शिरुर येथे बदली झाल्यानंतर त्याच वेगाने अतिक्रमणे हटाव मोहिम राबवत, क्रिडा संकुल, भुयारी गटरची कामे केली. तेथून त्यांची बदली भोर पालिकेत झाली. तेथेही त्यांनी स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबवले. सायकल चालवणे स्पर्धा, कचरा डेपोत वृक्षारोपण, जींगल स्पर्धा असे उपक्रम राबवल्याने त्यांचा तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवही झाला होता. येण्यापूर्वी भोर पालिकेतंर्गत त्यांनी अनेक चांगले उपक्रम हाताळले आहेत. त्यांची साताऱयात बदली झाली असून साताऱयात सोनगाव कचरा डेपोतला बायोमायनिंग प्रकल्प, भुयारी गटरचे अपूर्ण काम, कास धरणाच्या उंचीचे काम अशी आव्हाने आहेत. पालिकेत गटतट असून चांगले काम करणाऱया मुख्याधिकारी डॉ. विजयराव थोरात यांनी सर्जरीच करावी लागणार आहे. तसेच ते क्रिकेटप्रेमी,धावपट्टू व शिवप्रेमी असल्याने साताऱयातील आव्हाने पेलून प्रश्नही सोडवतील, अशी आशा सातारकरांना आहे.

Related Stories

सातारा : ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे औंध रस्त्याचे काम बंद पाडले

Archana Banage

लसीकरण होतंय गल्लोगल्ली

datta jadhav

फेसबुकवरील फोटोद्वारे महिलांची बदनामी करणारा गजाआड

Archana Banage

राजसदरेवर चांदीच्या पालखीतून सोन्याच्या मूर्तीचा सोहळा करण्याचा संकल्प

Patil_p

महाबळेश्वरात संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात युवकाची आत्महत्या

Archana Banage

शहरात चिकुन गुनियासदृश्य रुग्ण वाढले

Patil_p