Tarun Bharat

डॉ. विशाल च्यारीचा अद्याप शोध लागेना

सलग दुसऱया दिवशी शोध मोहीम

प्रतिनिधी/ मडगाव

गोवा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विशाल च्यारी हे शनिवारपासून गुढरित्या बेपत्ता आहेत. चार दिवस उलटे तरी त्यांचा तपास लागलेला नाही. केपे पोलिसांनी काल सलग दुसऱया दिवशी पर्वत-पारोडा येथील जंगल भागात त्यांचा शोध घेतला. सुमारे 40 पोलीस कर्मचारी या शोध मोहिमेत सहभागी झाले  होते.

डॉ. च्यारी हे बेपत्ता झाल्याची तक्रार ओल्ड गोवा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आलेली आहे. त्यांची कार सोमवारी मुळस-पारोडा येथे पार्क केलेली आढळून आली आहे. या कारमध्ये त्याचा मोबाईल तसेच लॅपटॉप सुद्धा पोलिसांना सापडला आहे. त्याच बरोबर त्याचे काही कपडे देखील कारमध्ये होते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पर्वतावर जात असल्याचे स्पष्ट

च्यारी यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पर्वतावरील मंदिरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजचा आधार घेतला. त्यात प्रा. च्यारी आपली कार पार्क करून पर्वतावर जाणाऱया पायऱया चढत असल्याचे आढळून आले आहे. पर्वतावरील पायऱया चढून ते नेमके कुठे गेले याचा थागपत्ता लागत नाही. पर्वतावरील जंगल भागात गेले की, पुन्हा खाली येऊन कार तिथेच सोडून अन्यत्र कुठे गेले का ? असा सवाल उपस्थितीत झालेला आहे.

पर्वत-पारोडा भागात घनदाट जंगल असून या जंगलात शोध मोहिंम राबविणे एक प्रकारचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, सलग दोन दिवस या भागात पोलिसांनी शोध मोहिम राबविली. काल मंगळवारी जवळपास चाळीस पोलीस या मोहिमेत सहभागी झाले होते. पण, त्यांना डॉ. च्यारी यांचा शोध लावणे शक्य झाले नाही. पर्वतावरील बराच भाग पोलिसांनी दोन दिवस लागून पिजून काढला.

चार महिन्यापूर्वी विद्यापीठात रूजू झाले होते

डॉ. विशाल च्यारी हे चार महिन्यापूर्वी गोवा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात रूजू झाले होते. त्यापूर्वी ते मडगावच्या दामोदर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती.

Related Stories

आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात एसआयटीत तक्रार

Amit Kulkarni

आर्थुर डिसिल्वा यांच्याकडून मडगावातून लढण्याची तयारी

Amit Kulkarni

मार्ली वाडय़ावरील रस्ता तयार करणे हे आपले स्वप्न

Amit Kulkarni

आमचे आमदार कधीच पक्षांतर करणार नाही

Omkar B

वरकटो – सांगे येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू

Amit Kulkarni

मुरगाव बंदर ओस, केवळ अत्यावश्यक माल हाताळणी, वास्को शहरातही अवकळा, 40 कोटीच्या नुकसानीचा अंदाज

Omkar B