Tarun Bharat

डॉ.विशाल च्यारी यांना अर्थशास्त्रातील कार्यासाठी पुरस्कार

Advertisements

कार्याचा गौरव झाला, न्याय कधी मिळणार : आई-वडिलांचा सवाल

प्रतिनिधी / फोंडा

एखाद्या क्षेत्रात अविरतपणे केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळणे हा मोठा आनंद असतो. डॉ. विशाल रामा च्यारी यांना अर्थशास्त्रातील कार्याबद्दल भारतरत्न राजीव गांधी सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. मात्र हा आनंद साजरा करण्यासाठी डॉ. विशाल हे हयात नाहीत.

तामिळनाडूच्या ग्लोबल इकोनॉमिक प्रोगेस ऍण्ड रिसर्च असोसिएशन या संस्थेने डॉ. विशाल च्यारी यांच्या अर्थशास्त्र विषयातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुस्कार  प्रदान केलेला आहे. बंगळूर येथे नुकत्याच झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळय़ात दिवंगत डॉ. विशाल यांचे वडील रामा च्यारी व बहीण सावित्री च्यारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. विशाल च्यारी हे गोवा विद्यापिठात अर्थशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक होते. गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी ते अचानक बेपत्ता झाले व दहा दिवसानंतर पारोडा येथील चंद्रेश्वर भूतनाथ पर्वतावरील रानात त्यांचा मृतदेह आढळला होता. एका सामन्य कुटुंबात जन्मलेल्या डॉ. विशाल यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर गोवा विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक पदापर्यंत मजल मारली होती. अर्थशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय व त्यात त्यांनी भरीव असे कार्य केले होते. त्याची दखल घेऊन ग्लोबल इकॉनोमिक प्रोग्रेस व रिसर्च असोसिएशन या तामिळनाडू येथील संस्थेने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला. पुरस्कारासाठी विशालची निवड करीपर्यंत ते हयात नसल्याची कल्पना या संस्थेला नव्हती. पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र विशालच्या नावाने बोरी येथे राहत असलेल्या त्याच्या आईवडिलांपर्यंत पोचले, तेव्हा त्यांनी संस्थेला त्याची कल्पना दिली.  कुटुंबीयांनी केलेल्या पत्र व्यवहारानंतर त्यांना मरणोत्तर पुरस्कार देण्याचा निर्णय संस्थेने घेतला. अर्थशास्त्र विषयात डॉ. विशाल यांनी केलेले कार्य अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. विशालचा मृत्यू ही आत्महत्या नसून त्यात घातपात असल्याचा कुटुंबीयांना अजूनही संशय आहे. तशी तक्रारही त्याची आई सुगंधा रामा च्यारी यांनी केपे पोलीस स्थानकात दाखल करुन या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. सध्या ओल्ड गोवा पोलीस स्थानकात ही तक्रार वर्ग करण्यात आली आहे. आपल्या मुलाला मृत्यू पश्चात तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्याचे आई वडील बाळगून आहेत.

Related Stories

शाळांतर्गत मूल्यमापनावरुन लागणार दहावीचा निकाल

Amit Kulkarni

पावसाचे पाणी नैसर्गिकस्तरावर साठविणारा पहिला प्रयोग केळावडे येथे यशस्वी

Amit Kulkarni

पिसुर्ले पंचायत क्षेत्रांत बेकायदेशीर चिरेखाणीची धडधड पुन्हा सुरू

Patil_p

बाणावली सरपंचाविरूध्द न्यायालयीन अवमानाची नोटीस

Amit Kulkarni

पुणेरी स्टाईलने युवकाची समजूत काढत पुरोहिताने प्राण वाचविले

Amit Kulkarni

कोने-प्रियोळ येथे दुचाकी-बसच्या अपघातात दोन युवक गंभीर

Amit Kulkarni
error: Content is protected !!