Tarun Bharat

डॉ. शुभदा शहा यांचे आज व्याख्यान

Advertisements

मंथनच्या यूटय़ूब चॅनेलवर होणार प्रसारित

प्रतिनिधी/ बेळगाव

मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगावतर्फे ‘कविवर्य कृ. ब. निकुंब : साहित्य आणि आस्वाद’ या विषयावर प्रा. डॉ. शुभदा शहा यांचे व्याख्यान होणार आहे. कृ. ब. निकुंब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा. मंथनच्या यूटय़ूब चॅनेलवर हे व्याख्यान होणार आहे.

मराठी साहित्याच्या काव्य दालनात आपल्या तरल काव्याने समृद्धी आणणारे कृ. ब. निकुंब यांचा जन्म 9 ऑगस्ट 1920 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम. ए. पदवी घेतली. अंतिम परीक्षेत न. चि. केळकर सुवर्णपदक व चिपळूणकर पारितोषिकाचे ते मानकरी होते.

बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख व मराठीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. उज्ज्वला, अनुबंध, साहाय्य साखर, पंख, पल्लवी, मृगावर्त, अभ्र हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. फणसाचे पान व पारख काव्ये हे त्यांचे समीक्षा संग्रह प्रसिद्ध आहेत. रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Related Stories

सिल्क इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन

Amit Kulkarni

डेंग्यू दिनानिमित्त काकती येथे जागृती फेरी

Amit Kulkarni

आरटीओ-चन्नम्मा चौकापर्यंतचे गतिरोधक कुचकामी

Amit Kulkarni

कुलसचिवांच्या अरेरावीबद्दल अभाविचे निवेदन

Amit Kulkarni

शुभम शेळके यांच्या प्रचारात खानापूर म.ए.समितीचा सहभाग

Amit Kulkarni

देवगड, कर्नाटक हापूसचे दर अद्यापही तेजीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!