Tarun Bharat

डॉ.सतीश कुडचडकर, डॉ. सिक्लेटिका रिबेलो यांनी मिळविली सुवर्णपदके

अखिल भारतीय रेंकींग मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

अखिल भारतीय मास्टर्स रेंकींग बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याच्या डॉ. सतीश कुडचडकर आणि डॉ. सिक्लेटिका रिबेलो यांना सुवर्णपदके प्राप्त झाली.  स्पेनमध्ये होणाऱया विश्वचषक मास्टर्स बॅडमिंटन स्पधेंत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळविलेल्या डॉ. सतीश कुडचडकर आणि डॉ. सिक्लेटिका रिबेलो या जोडीने 75 वर्षांवरील मिश्र दुहेरीत या सुवर्णपदकाला गवसणी घातली. गोवा बॅडमिंटन संघटनेने अखिल भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या अधिपत्याखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

नावेलीतील मनोहर पर्रीकर इडडोअर स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कुडचडेतील डॉ. कुडचडकर आणि मडगावच्या डॉ. रिबेलो या जोडीने वजीर चांद गोयल आणि उषा शर्मा या जोडीचा आरंभीच्या पहिल्या सेटमधील पिछाडीनंतर 20-22, 21-14, 21-12 असा पराभव केला. डॉ. सतीश कुडचडकर यांनी 75 वर्षांवरील पुरूष एकेरी आणि दुहेरीतही अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही अंतिम सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले.

पुरूष एकेरीत सुदाम शहारेने डॉ. कुडचडकरचा 21-13, 25-23 असा पराभव केला तर दुहेरीत अव्वल मानांकन लाभलेल्या सुरेश हेगडे व मोहन मुरारीलाल श्रीवास्तव जोडीने डॉ. कुडचडकर आणि आल्प्रेड ख्रिस्तियान जोडीला 21-18, 21-17 असे पराभूत केले.

या स्पर्धेत सर्वांत वयस्कर स्पर्धक असलेल्या गोव्याच्या डॉ. सिक्लेटिका रिबेलोने 75 वर्षांवरील महिला दुहेरीत जेतेपद पर्पेच्युआ जॅकीसच्या साथीने मिळविले. 70 वर्षांवरील मिश्र दुहेरीत गोव्याच्या हिलारियो फर्नांडिस व मालाक्विन्हा फर्नांडिस या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात त्यांना राकेश शर्मा आणि माया चावत यांनी 21-8, 21-3 असे पराभूत केले. गोव्याच्या या दोघांनाही रौप्यपदक मिळाल्याने त्यांनी स्पेनमध्ये होणाऱया विश्वचषक मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याची पात्रता मिळविली.

70 वर्षांवरील महिलांच्या एकेरीत गोव्याच्या मुक्ता आगशीकरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम लढतीत माया चावत हिच्याकडून 10-21, 8-21 असा पराभव स्वीकारावा लागला. या वयोगटातील महिला दुहेरीतही गोव्याच्या मुक्ता आगशीकर आणि भारती हेबळे यांना रौप्यपदक मिळाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चमकदार खेळ करणाऱया गोव्याच्या तानाजी सावंत यांना 65 वर्षांवरील पुरूष एकेरीत ब्राँझपदाकावर समाधान मानावे लागले. सिल्वर मेडलसाठी झालेल्या लढतीत त्यांचा अनिल मित्तलने पराभव केला.

Related Stories

कोंब येथे रस्त्यानजीक फेकलेला कचरा हटविला

Amit Kulkarni

विजेचे ‘आरएमयू’ स्वप्न साकारु शकलो नाही

Patil_p

नगरसेवक महेश आमोणकरकडून मडगावात घरोघरी प्रचारावर भर

Amit Kulkarni

राज्य विधानसभेचे अधिवेशन आज

Patil_p

इंग्रजी शाळांचे अनुदान बंद न झाल्यास भाजपा तेरावरून शुन्यावर येईल- प्रा. सुभाष वेलिंगकर

Amit Kulkarni

सुर्ला ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांमुळे प्रगतीच्या दिशेने

Amit Kulkarni