Tarun Bharat

डोंबरजवळगे येथील घरातुन रागाने गेलेल्या मुली टेंभुर्णीत सापडल्या

Advertisements

प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट येथील उत्तर पोलिस स्टेशन हद्दीतील तालुक्यातील डोंबरजवळगे गावातील इयत्ता आठवी व दहावीत शिकणा-या दोन अल्पवयीन मुली घरातील आईवडिल रागावल्याने शनिवारी सकाळी नऊ वाजता घरातुन निघुन गेल्या होत्या. या दोघी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर बोरेगाव येथे इंग्रजी विषयाचा त्यातील एकीचा दहावीचा पेपर असल्यामुळे गेल्या होत्या. बोरेगांव येथून अज्ञात व्यक्तीच्या टू व्हीलर वर लीफ्ट घेऊन सोलापूरला गेल्या. तेथुन पुण्याच्या दिशेने जात होत्या. त्यातील एकीकडे मोबाईल होते. डोंबरजवळगेच्या पोलीस पाटलांनी तातडीने उत्तर पोलीस स्टेशनला कळविले.

पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी तातडीने हालचाली करत मोबाईल लोकेशन घेतले.मोबाईल लोकेशन मोहोळ येथे आढळल्याने टेंभुर्णी येथे नाकाबंदी केली. मुलींची माहिती पाठवुन टेंभुर्णी येथे प्रत्येक वाहन तपासणी करण्याचे आदेश दिले. टेंभुर्णी टोलनाक्यावर एस टी बस मध्ये दोन्ही मुली आढळुन आले. मुलींना आई वडिलांच्या स्वाधीन केले. घरी आईवडिल रागावल्याने व घरच्यांचा त्रास नको म्हणुन निघुन गेले असल्याचे मुलींना सांगितले. शाळेसाठी दिलेल्या मोबाईल वरून गुगल वर सर्च करून पुणे येथे रूम बघुन ठेवले होते. टेंभुर्णीचे सपोनी सुजीत भोसले, पोलीस हवालदार प्रवीण वाळके, महादेव चिंचोळकर, अश्पाक मियाँवाले, प्रमोद शिंपाळे, चिदानंद उपाध्ये आदींनी तातडीने हालचाल करत मुलींना पालकांच्या स्वाधीन केले.

हे कळताच अक्कलकोट उत्तर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  जितेंद्र कोळी यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण वाळके आणि डोंबर जवळगे पोलीस पाटील पुनम गायकवाड यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबर वरून ही माहिती व मुलींचे फोटो अक्कलकोट तालुक्यातील सर्व गावांना तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि गावकऱ्यांना कळवले. 
सगळीकडे नाकाबंदी लावण्यात आली. टेंभुर्णी टोल नाक्यावर नाकाबंदीमध्ये टेंभुर्णी पोलिसांनी मुलींना ताब्यात  घेतले व पालकांच्या स्वाधीन केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे घरातुन निघुन गेलेल्या दोन्ही मुली सुरक्षित रित्या पालकांच्या स्वाधीन करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले.

Related Stories

यशस्वी वकिलीचे सूत्र नाही : कपिल सिब्बल

prashant_c

बार्शीत जिल्हाधिकारी यांचा घरपोच गॅसचा आदेश वाऱ्यावर

Archana Banage

बसव कॉलनीत खुनामुळे खळबळ

Tousif Mujawar

सोलापूर : मर्चंट नेव्हीमधील अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला;आरोपी मोकाट

Archana Banage

प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात तिरंगी सजावट

Archana Banage

मिरज इदगाहनगर येथे अवैध शस्त्र बाळगणारा जेरबंद

Archana Banage
error: Content is protected !!