Tarun Bharat

डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वृद्धी

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक नजीक आल्याने डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बिडेन यांच्या लोकप्रियतेसंबंधी सर्वेक्षणे होऊ लागली आहेत. एका सर्वेक्षणानुसार बिडेन यांची लोकप्रियता ट्रम्प यांच्या तुलनेत केवळ 3 टक्के अधिक आहे. जुलैमध्ये झालेल्या सर्वेक्षणात या दोघांमधील अंतर 7 टक्क्यांपेक्षा अधिक होते. नव्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांची लोकप्रियता पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे.

द हिल अँड हॅरिसकडून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार बिडेन यांना 43 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर 40 टक्के लोकांनी ट्रम्प यांना पसंती दर्शविली आहे. जुलै महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात बिडेन हे ट्रम्प यांच्या तुलनेत 3 अंकांनी आघाडीवर होते. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या अन्य 3 राष्ट्रीय सर्वेक्षणांनुसार बिडेन यांना ट्रम्प यांच्यावर सरासरी 5 टक्क्यांची आघाडी प्राप्त आहे.

अध्यक्षीय उमेदवारांमधील चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडेन यांच्यासोबत 4 प्रेसिडेन्शियल डिबेट करू इच्छित आहेत. प्रेसिडेन्शियल डिबेटच्या आयोगाने आतापर्यंत केवळ 3 चर्चा निश्चित केल्या आहेत. दोघांमधील वादविवाद 29 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर रोजी आयोजित होणार आहे. ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेचे प्रतिनिधी रुडोल्फ डब्ल्यू गुइलियानिम यांनी प्रेसिडेन्शियल डिबेटच्या आयोगाला यासंबंधी एक पत्र लिहिले आहे. सप्टेंबरच्या प्रारंभी एक वादविवाद आयोजित केला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Stories

भारतीय आंबा समुद्रमार्गे अमेरिकेत पोहोचला

datta jadhav

चमोली प्रलयातील 130 बेपत्ता घोषित

Patil_p

खलिस्तान समर्थकांसमोर झुकले पंजाब पोलीस

Amit Kulkarni

मध्यप्रदेश : बंडखोर आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्विकारले

tarunbharat

भाजपकडून 25 टक्के तिकिटे पूर्वाश्रमीच्या काँग्रेसवाल्यांना

Patil_p

17 महिलांची हत्या करणाऱयाला जन्मठेप

Patil_p