Tarun Bharat

डोळ्यांच्या रूग्णांत वाढ, स्ट्रेनचा धोका !

बदलत्या वातावरणामुळे डोळ्यांना संसर्ग

प्रतिनिधी / कोल्हापूर

वातावरणातील बदलामुळे डोळ्यांची साथ पसरली आहे. जिल्ह्यात डोळे आलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डोळे आलेल्या रूग्णांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. डोळे येणे ही संसर्गजन्य साथ आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या लक्षणांत डोळे दुखणे लक्षण समाविष्ट आहे. डोळेदुखीशी निगडीत अंगदुखी, घसा खवखवणे आदी लक्षणे असतील तर कोरोना टेस्ट करावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी केले आहे.

थंडीच्या दिवसांत त्यातही दमट हवामानात डोळ्यांना संसर्ग करणारे विषाणू वाढतात. त्यातून डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, डोळ्यात टोचणे आदी लक्षणे दिसतात. याला वैद्यकीय भाषेत डोळे येणे असे म्हणतात. व्हायरल इन्फेक्शनमुळे डोळ्यांना संसर्ग होतो. त्याला कंटेजिअस म्हणतात. यामध्ये डोळे लाल होतात, डोळयांत सतत टोचत असल्याचा त्रास होतो. सप्ताहभरात पाऊस ऊन, थंडी अन् ढगाळ वातावरणामुळे डोळे आलेल्या रूग्णांत वाढ झाली आहे. वैद्यकीय शाखेतील काही विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचा हा संसर्ग दिसून आला आहे. डोळ्यांच्या हॉस्पिटल्समध्येही असे रूग्ण वाढले आहेत.

सीपीआरमधील डॉ. अभिजित ढवळे म्हणाले, थंडीच्या दिवसांत डोळ्यांना व्हायरल इन्फेक्शन होणे ही कॉमन बाब आहे. अगदी ऍलर्जीमुळेही डोळे येऊ शकतात. डोळे लालसर होणे, डोळ्यात टोचण्याकडे दुर्लक्ष केल्यास डोळयांना गंभीर इजा पोहोचू शकते. डोळ्यांच्या नसात रक्त उतरल्याने कधीकधी डोळे लाल होतात. बुबुळाशी निगडीत नेत्रविकारात अशी लक्षणे दिसतात. व्हायरल इंन्फेक्शनमध्येही डोळे लाल होतात. त्यांची आग होते, त्यामुळे अशा व्यक्तींनी डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच डोळे दुखत असल्यास तीन दिवस विश्रांती घ्यावी, त्यांनी कोणाच्याशी संपर्कात येणे टाळावे, त्या व्यक्तीचे रूमाल, मास्क आदी वस्तू अन्य व्यक्तींनी वापरू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना नव्या स्ट्रेनच्या लक्षणांत डोळेदुखीही..

कोरोनाच्या नव्या विषाणुची जनुकीय रचना बदलली आहे. कोरोनाच्या लक्षणांत प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला ही प्रमुख होती. आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या लक्षणांत ताप, सर्दी, खोकल्यासह घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, पोट बिघडणे आणि डोळेदुखी या लक्षणांची भर पडली आहे. त्यामुळे फक्त डोळेदुखी असेल तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच डोळे आल्यामुळे त्यांनी संपर्क टाळावा. पण डोळेदुखीसोबत घसा दुखणे, अंगदुखी आदी अन्य लक्षणे असतील तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन डॉ. अभिजित ढवळे यांनी केले आहे.

Related Stories

अंबप येथे बेवारस प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले,शरीराचे काही भाग गायब, घातपाताचा संशय?

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी चार वाजेपर्यंत २४४ पॉझिटिव्ह

Archana Banage

आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक; प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

वाकरे येथे “गोरगरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य “

Archana Banage

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यास दिरंगाई; पुरातत्व विभागाचं श्राद्ध घालत मनसेकडून निषेध

Archana Banage

लसीचा दुष्काळ, मग लसोत्सव कसा होणार ?

Archana Banage