Tarun Bharat

ड्रग्जच्या नशेत परदेशी पर्यटक सावंतवाडीत ताब्यात

सावंतवाडी/प्रतिनिधी :
सध्या ड्रग्ज, गांजा, अमली पदार्थांचे प्रकरण देशात गाजत असून बाॅलिवूड क्षेत्रातील विविध नामवंत कलाकार यात सहभागी असल्याचे समोर येत आहे. या अमली पदार्थांची नाळ आता गोव्यापर्यंत पोहचू लागली आहे. नाताळ आणि नववर्ष निमित्ताने सध्या परदेशी पर्यटकांचे गोव्यात वास्तव्य असून अमली पदार्थांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  गोव्यातून एका फोर व्हीलरमधून आलेल्या काही व्यक्तींनी आंबोली मार्गावरील माडखोल तांबळवाडी नजीक आपल्यासोबतच्या अमली पदार्थ सेवन केलेल्या एका परदेशी व्यक्तीला गाडीतून फेकून देण्याची घटना घडली असून या व्यक्तीसोबत एक पिशवी असून त्यात अमली पदार्थ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अमली पदार्थ सेवन केलेल्या परदेशी पर्यटकाला स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या पर्यटकाची कसून चौकशी सुरू आहे. हा पर्यटक कुठून आला व कुठे जात होता याचा अद्याप शोध लागलेला नाही तसेच त्याला टाकून जाणारे कोण आणि कुठले आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत. माडखोलचे सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ, शैलेश माडखोलकर यांनी सावंतवाडी पोलिसांना याबाबतची माहिती पुरवली.

Related Stories

आड़ाळी सरपंचपदी पराग गावकर

Anuja Kudatarkar

झाराप येथे रविवारी विद्यार्थी सन्मान सोहळा

NIKHIL_N

पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रीय रहावे- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

Anuja Kudatarkar

कळणे वासियांनी किती काळ वाट पाहावी?

NIKHIL_N

रत्नागिरी : सलग नवव्या वर्षी कोकणच राज्यात अव्वल, ९८.७७ टक्के निकाल

Archana Banage

वास्कोच्या नगरसेविकेचा सातोसे येथे सत्कार

Anuja Kudatarkar