Tarun Bharat

ड्रग्ज तस्करांचे संशयास्पद विमान क्विंटाना रू प्रांतात उतरले

ऑनलाईन टीम / मेक्‍सिको सिटी : 

ड्रग्ज तस्करांचे संशयास्पद विमान मेक्‍सिकोमधील क्विंटाना रू प्रांतात एका महामार्गावर उतरले. हायवेवर उतरताच हे विमान जळून खाक झाले. 

संशयास्पद असलेले हे विमान दक्षिण अमेरिकेतून आले होते. मेक्‍सिकोच्या हवाई हद्दीमध्ये शिरल्यापासून या विमानावर लक्ष ठेवण्यात आले होते. हे छोटे विमान मेक्‍सिकोमधील क्विंटाना रू प्रांतातील एका महामार्गावर उतरले. हे विमान महामार्गावर उतरत असतानाच विमानाने पेट घेतला होता. महामार्गावर उतरल्यावर विमान जळून खाक झाले.

ज्या महामार्गावर विमान जळाले तेथून थोड्याच अंतरावर सुरक्षा रक्षकांना एका पिक अप ट्रकमध्ये कोकेनने भरलेली 13 पोती आढळून आली. या पोत्यांचे एकूण वजन 850 पौंड म्हणजेच 390 किलो आहे. त्यावरून जळालेले विमान ड्रग्ज तस्करांचे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युकातन पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

Related Stories

जिनपिंग विरोधी गट होतोय बळकट

Patil_p

पक्ष्याच्या विष्ठेपासून तयार होते सर्वात महागडी कॉफी

Patil_p

Kolhapur; कुख्यात इराणी हिसडा गँगच्या म्होरक्यासह चौघे अटकेत

Kalyani Amanagi

लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

बंगालमध्ये लसीकरणावरून राजकारण

Patil_p

मुंबई-कर्नाटकचे झाले ‘कित्तूर-कर्नाटक’; सरकारने केली घोषणा

Archana Banage