Tarun Bharat

ड्रग्ज माफियांवर धडक कारवाई

Advertisements

सीबीआय-एनसीबीकडून 175 जणांना अटक : महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये छापे

  • 175 संशयितांना अटक
  • 127 एफआयआर नोंद
  • 6,600 जणांची चौकशी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय आणि एनसीबीने ‘ऑपरेशन गरुड’ अंतर्गत आठ राज्यांच्या पोलिसांसोबत अमली पदार्थ तस्करीच्या कारनाम्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन गरुड’अंतर्गत तपास यंत्रणांनी गुरुवारी देशभरात विविध ठिकाणी छापा टाकून तब्बल 175 जणांना अटक केली आहे. यासंदर्भात एकूण 127 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली आणि मणिपूर या राज्यांमध्ये प्रामुख्याने ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली. या छाप्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर ड्रग्ज ताब्यात घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

नुकतीच एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडीनं देशभरात विविध ठिकाणी केलेल्या संयुक्त छापेमारीमध्ये पीएफआय या संघटनेवर मोठी कारवाई करण्यात आली. यानंतर आता पुन्हा एकदा देशातील तपास यंत्रणांनी केलेल्या एका मोठय़ा संयुक्त कारवाईमध्ये देशातील ड्रग्ज माफियांना मोठा झटका दिला आहे. ‘ऑपरेशन गरुड’ अंतर्गत देशभरात ही छापेमारी करण्यात आली असून या संपूर्ण मोहिमेचे नियोजन सीबीआयने केले होते. सीबीआयसोबत अंमली पदार्थविरोधी विभाग (एनआयए) आणि वेगवेगळय़ा राज्यांच्या पोलीस दलाचाही समावेश होता. विशेष म्हणजे या मोहिमेत इंटरपोललाही सहभागी करण्यात आल्यामुळे हा ड्रग्ज माफियांना मोठा झटका मानला जात आहे.

175 आरोपींना अटक

देशात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तपास यंत्रणांनी 175 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात ड्रग्जही जप्त केले आहेत. या कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणांना इंटरपोलची मदतही देण्यात आली आहे. ऑपरेशन गरुड दरम्यान सुमारे 127 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेत सुमारे 6,600 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.

मोठय़ा प्रमाणात मुद्देमाल जप्त

या प्रकरणात अनेक मोठे कनेक्शन समोर आले आहेत. 175 अमली पदार्थ तस्करांना अटक करून 5.125 किलो हेरॉईन, 33.936 किलोग्रॅम गांजा, 3.29 किलो चरस, 1,365 ग्रॅम मेफेड्रोन, सुमारे 33.80 किलो स्मॅक, 87 गोळय़ा, 122 इंजेक्शन्स आणि 87 ब्यूप्रेनोर्फिन सिरिंग्ज असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच अल्प्राझोलम 946 गोळय़ा, सुमारे 105.997 किलो ट्रामाडोल, 10 ग्रॅम हॅश, 0.9 ग्रॅम एक्स्टसी गोळय़ा, 1.150 किलो अफू, 30 किलो अफू पावडर, सुमारे 1.437 किलो अमली पदार्थ पावडर आणि सुमारे 11,039 अन्य गोळय़ा जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.

इंटरपोलचाही मोहिमेत समावेश

सीबीआय मुख्यालयातील वरि÷ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत एनसीबी आणि राज्य पोलिसांसह इंटरपोलचाही सहभाग होता. कारवाई होणाऱया अनेक आरोपींचे विदेशी ड्रग्ज माफियांशी संबंध असल्यामुळे सीबीआयला इंटरपोलची मदत घ्यावी  लागली. गेल्या काही वर्षांत इंटरपोलकडून सीबीआयला अनेक महत्त्वाचे इनपुट शेअर करण्यात आले. त्यानंतर अनेक राज्यांच्या पोलिसांसह सीबीआयने या कारवाईचे नेतृत्व केले. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Related Stories

ममतांनी देशासाठी लढावं: जावेद अख्तर

Archana Banage

सरकारचा मोठा निर्णय : चीनला परत करणार खराब अँटीबॉडी टेस्ट किट

prashant_c

गुजरातमध्ये शालेय शिक्षणात वैदिक गणित येणार

Amit Kulkarni

‘आरोग्य सेतू’वर लसीकरणाचा स्टेटस अपडेट करता येणार

Patil_p

9 हजार शेतकऱयांची कर्ज खाती अपलोड

Patil_p

काँग्रेस नेत्याची ब्राह्मणांना धमकी

Patil_p
error: Content is protected !!