Tarun Bharat

ड्रोन वापराबाबत मार्गदर्शक तत्वे जारी

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्रात झालेल्या हल्ल्यानंतर ड्रोनच्या वापराबद्दल प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे. श्रीनगरचे जिल्हा अधिकारी मोहम्मद एजाज यांनी आज ड्रोनच्या वापराचे नियमन करण्यासाठी मानक ऑपरेटिंग मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्या व्यक्तींकडे ड्रोन कॅमेरे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे मानवरहित हवाई वाहन आहे, त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनला याची माहिती द्यावी लागणार आहे.

यापूर्वी कठुआ जिल्ह्यात लग्न समारंभ आणि इतर कोणत्याही कार्यक्रमादरम्यान ड्रोनचा वापर करण्यासाठी ड्रोनची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ड्रोन किंवा इतर उडत्या खेळण्यांच्या वापरास मनाई करणारे कलम 144 देखील लागू केले आहे.

नवीन मार्गदर्शक तत्वानुसार कठुआ जिल्ह्यात ड्रोन ऑपरेशनसाठी आता एसीआर किंवा एसडीएमची परवानगी बंधनकारक असणार आहे. जे त्याला स्वतंत्र ओळख क्रमांक जारी करतील आणि त्याची संपूर्ण नोंद देखील ठेवतील.

Related Stories

पंपोरमध्ये दहशतवाद्यांचा CRPF पथकावर गोळीबार; 2 जवान शहीद

datta jadhav

दिल्ली : आंदोलनात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; मृतांची संख्या 10 वर

datta jadhav

गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील 6 जण बुडाले

Patil_p

राजस्थान : जयपूर विमानतळावर 14 प्रवाशांकडून 32 किलो सोने जप्त

Tousif Mujawar

सीएएचा मुस्लिमांना धोका नाही

Patil_p

लष्करातील ‘झूम’ श्वानही हुतात्मा

Amit Kulkarni
error: Content is protected !!