Tarun Bharat

डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धा कोलकातामध्ये

वृत्तसंस्था/ कोलकाता

आशिया खंडातील सर्वात जुनी म्हणून ओळखली जाणारी डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धा आगामी पाच वर्षांच्या कालावधीत केवळ कोलकाता शहरामध्येच खेळविली जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे.

130 वी डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धा कोलकाता शहरामध्ये भारतीय सेनादलाच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारपासून खेळविली जाणार आहे. कोलकाता शहराला या स्पर्धेचे सलग दुसऱयांदा यजमानपद लाभत आहे. 2019 साली ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये खेळविली गेली होती. रविवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत 16 संघांचा समावेश राहील. हे संघ चार गटांमध्ये विभागले जातील. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेतील विद्यमान विजेता कोलकात्याचा मोहम्मेडन स्पोर्टिंग संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना रविवारी येथील सॉल्टलेक स्टेडियमवर होणार आहे.

या स्पर्धेत अ गटात इंडियन एअरफोर्स, बेंगळूर युनायटेड, सीआरपीएफ, मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब, ब गटात- आर्मी ग्रीन, एफसी गोवा, जमशेदपूर एफसी, सुदेवा दिल्ली एफसी, क गटात- बेंगळूर फुटबॉल क्लब, दिल्ली एफसी, इंडियन नेव्ही संघ, केरळ ब्लास्टर्स, ड गटात- आसाम रायफल्स, आर्मी रेड फुटबॉल संघ, गोकुळम केरळ आणि हैद्राबाद एफसी यांचा समावेश आहे.

Related Stories

द.कोरियाची आगेकूच, उरुग्वे स्पर्धेबाहेर

Patil_p

हैदराबादचा ‘सनराईज’, गुंतागुंत वाढली!

Patil_p

दिलबहार-जुना बुधवार ‘गोलशून्य’ बरोबरीत

Archana Banage

के. एल. राहुलला दंड

Patil_p

विराट ‘बॅड पॅच’वर निश्चितपणाने मात करेल

Amit Kulkarni

विम्बल्डन स्पर्धेपर्यंत डब्ल्यूटीएचे वेळापत्रक जाहीर

Patil_p