Tarun Bharat

डय़ुरँड स्पर्धेत मोहम्मेडन उपान्त्यपूर्व फेरीत

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब, केरळ ब्लास्टर्स आणि आर्मी ग्रीन संघाने विजय नोंदविले. आयएसएलमध्ये खेळणाऱया जमशेदपूर एफसीला आर्मी ग्रीन संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.

कल्याणी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबने स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद करताना सीआरपीएफ संघाचा 5-1 गोलानी पराभव करून उपान्त्यपूर्व बाद फेरीत प्रवेश मिळविला. मोहम्मेडन स्पोर्टिंगसाठी अझरुद्दीन मलीक आणि मार्पुस जोसेफ यांनी प्रत्येकी दोन तर ब्रँडनने एक गोल केला. पराभूत सीआरपीएफचा एकमेव गोल दशप्रीतने केला.

स्पर्धेत एका धक्कादायक विजयाची नोंद करताना आर्मी ग्रीन फुटबॉल संघाने आयएसएलमध्ये खेळणाऱया जमशेदपूर एफसी संघाचा 3-1 गोलानी पराभव केला. आर्मी ग्रीन संघासाठी दिपक सिंगने दोन तर एक गोल सोचिन छेत्रीने एक गोल केला. पराभूत जमशेदपूर एफसीचा एकमेव गोल जितेंद्र सिंगने पेनल्टीवर नोंदविला.

विवेकानंद युवा भारती प्रीडांगण मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात केरळ ब्लास्टर्स संघाने भारतीय नौदल संघाचा एकमेव गोलने पराभव केला. सामन्याच्या 71व्या मिनिटाला उरूग्वेचा खेळाडू ऍड्रियान लूनाने केलेला गोल मोलाचा ठरला.  

Related Stories

सोनसडय़ासंदर्भात कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार

Amit Kulkarni

अपयश लपविण्यासाठीच ‘प्रशासन तुमच्या दारी’ चा स्टंट

Patil_p

सत्तरीतील अनेक गावांत कोरोना बाबत सतर्कतेचा इशारा

Omkar B

पेन्ह द फ्रान्समधील अतिक्रमणावर कारवाई

tarunbharat

शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीचे गावांतवाडा येथे आगमन

Amit Kulkarni

बाजारमळ-कुर्टी येथे बेकायदेशीर भंगारअड्डय़ावर कारवाई

Amit Kulkarni