Tarun Bharat

ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत

सुगी गामात व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव तालुक्मयात सध्या भात कापणी आणि मळणीची धांदल उडाली आहे. अशा परिस्थिती गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे जर पाऊस पडला तर हातातोंडाला आलेले भात पिक वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आणखी 15 दिवस तरी पाऊस नको अशीच आशा शेतकऱयांना लागून राहिली आहे.

सर्वत्र सुगीची लगबग सुरु आहे. भात कापणी जोरात सुरु असून मध्यंतरी झालेल्या पावसानंतर त्याला जोर आला होता. मात्र सोमवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बळीराजा आता सुगी करुन कडधान्य पेरणीबरोबरच काही शेतकरी मळणीही करु लागले आहेत. असे असताना अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त बनला आहे.

यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. याचबरोबर सर्वच पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सर्वच पिके जोमात होती. शेतकरी मोठय़ा आनंदात सुगी करत होता. मात्र मध्यंतरी पावसाला सुरुवात झाल्याने सर्वच कामे खोळंबली होती. त्यानंतर थंडीला सुरुवात झाली. केवळ दोन ते तीन दिवस थंडी पडली आणि पुन्हा गायब झाली. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीत घट झाली आहे.

तालुक्मयात सध्या जोरदार मळणी आणि कापणीचे कामे सुरू झाली आहे. दक्षिण भागातील सुगी काही प्रमाणात आटोपती आली असली तरी पश्चित, पूर्व व उत्तर भागात जोरदार सुगीला सुरूवात झाली आहे. मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सारेच संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसानेही पूर्ण विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱयांतून समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच पुन्हा एक नवीन संकटाला सामोरे जातानाचे चित्र दिसून येत आहे.

काही भाग पिके कापून ठेवण्यात आली असून पाऊस पडला तर ही पिके खराब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी मळणीचे कामे घाईगडबडीने आटोपती घेतानाचे चित्र दिसून येत आहे. शेतकरी मोठय़ा जोमाने भात कापणी व मळणीची काम करु लागला आहे. मात्र अचानक पुन्हा हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळपासूनच आकाशामध्ये ढग दिसत होते. सायंकाळी तर अधिकच गडद छाया निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. एकूणच यावषी लहरी हवामानामुळे शेतकरी हवालदिल बनला आहे.

Related Stories

अखेर मनपाने पाठविल्या अर्थसंकल्प बैठकीच्या नोटिसा

Amit Kulkarni

जमखंडीत दुधाचा पावडरसाठा जप्त

Patil_p

28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली जुन्या बसपासची मुदत

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटीतर्फे लोकमान्य सुनिधी ठेव योजना कार्यान्वित

Amit Kulkarni

साहित्य संमेलनाला महाराष्ट्राची परवानगी

Patil_p

बेळवट्टी भागात बसफेऱ्या वाढवा

Patil_p