Tarun Bharat

ढवळीच्या उड्डाण पुलाचे पंचायत मंडळ व नागरिकांच्या उपस्थितीने उद्घाटन

वेळ काढू धोरणामुळे आमदार ढवळीकर यांनी उचलले पाऊल : सरकारच्या अनागोंदी कारभारावर ढवळीकर यांची टीका

वार्ताहर /मडकई

ढवळी येथील सत्यनारायण मंदिर जवळचा उड्डाण पुल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी गेली काही महिने नागरिक व वाहतुकदार आपल्याकडे करीत होते. तो वाहतुकिला खुला करण्यासाठी आपण सार्वजनीक बांधकाम खाते व सरकारला वारंवर सांगून शेवटी एका महिन्याची मुदत दिली. मात्र तरीही सरकारने हा विषय गांभीर्यांने न घेतल्याने काल मगो ज्येष्ठ नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी कवळेचे पंचायत मंडळ, बांदोडा पंचायत मंडळ व नागरिकांना घेऊन या उड्डाण पूलांचे उद्घाटन आपण करीत असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर व लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्री मंडळात आपण सार्वजनीक बांधकाम मंत्री म्हणून असताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यांने अनेक बायपास, उड्डाण पूल, महामार्ग व रस्ते ही कामे हाती घेतली होती. त्यातलाच हा ढवळीचा उड्डाण पूल रूपये 9 कोटी 50 लाख खर्चून हाती घेण्यात आला होता. 2017 साली या उड्डाण पुलाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. 2 वर्षात या उड्डाण पूलाचे काम पूर्ण करण्याची मुदत दिली होती. पण प्रत्यक्षात गेली 4 चार वर्षे लोटली तरी सरकार वाहतुकीसाठी तो खुला करीत नसल्याने नागरिक व वाहतुकदारांच्या आग्रहास्तव आपल्याला तो खुला करावा लागला असल्याचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी कवळे पंचायतीचे सरपंच राजेश कवळेकर, कवळेचे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच राजेश नाईक, फोंडय़ाचे मगो नेते डॉ. केतन भाटीकर, शिरोडय़ाचे मगो युवा उमेदवार व समाजसेवक संकेत मुळे, उपसरपंच मनुजा नाईक, पंचसदस्य सोनाली तेंडूलकर, मनोज बोरकर, द्रुपता नाईक, श्वेता गावडे, उषा नाईक, वामन नाईक, विशाखा गावडे, दुर्भाटच्या सरपंच सरोज नाईक पंचसदस्य मशाल जयवंत आडपईकर, राजेश नाईक, तळावलीचे पंचसदस्य हर्षल तळावलीकर, समीता नाईक, रजनीश कपिलेश्वरकर, पांडुरंग नाईक तसेच आजी माजी सरपंच, पंचसदस्य व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 भाजपा सरकारच्या अनागोंदी कारभारामूळेच ही कामे रेंगाळत आहेत. ती का रेंगाळतात त्याचे उत्तर सार्वजनीक बांधकाम मंत्री पाऊसकर यांनाच ठाऊक असल्याचा मार्मिक टोला आमदार श्री. ढवळीकर यांनी हाणला. आमदार श्री ढवळीकर यांनी सरकारचे वाभाढे वेशीवर टांगले. सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अभियंत्याना आपण या उड्डाण पूलाच्या उद्घाटनाला बोलविले होते. मात्र त्यांनी काँक्रीट घालण्याचे काम बाकी असल्याचे आपणास सांगितले. पण प्रत्यक्षात या उड्डाण पूलाचे काम पूर्ण झालेले आहे. म्हणूनच आपण हे उद्घाटन केले असल्याचे त्यांनी पूढे बोलताना सांगितले.  सरकारने हा रस्ता परत बंद करू नये. तसेच त्यांनी रस्त्याच्या बाजूला विद्युतची सोय करावी. तसेच गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साईन बोर्ड लावण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. सत्यनारायण मंदिराकडून जाणाऱया सर्व्हीस रोडवर या वाहतुकीचा ताण पडत होता. छोटेमोठे अपघात ही होत होते. या तक्रारी पंचायत मंडळ व नागरिक आपल्याकडे करीत होते हा रस्ता खूला केल्याने या समस्या निकालात निघालेल्या आहेत. देखभाल कामासाठी रूपये 100 कोटीची तरदुत करण्यात आली होती. त्यात बोरीचा रस्ता व ओल्ड गोवाचा रस्ता या कामांचा समावेश होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री पाऊसकर हे खड्डे बुजविल्याचे खोटेच सांगत असल्याचा आरोपही आमदार ढवळीकर यांनी यावेळी बोलताना केला.

Related Stories

बाराजण येथील दुचाकीस्वारावर गव्याचा हल्ला

Amit Kulkarni

बेळगाव-चोर्ला महामार्ग फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्णत्वाला गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती : तरुण भारताला दिली सदिच्छा भेट

tarunbharat

होंडा येथे पुन्हा अवजड वाहतूक रोखली

Amit Kulkarni

दुरुस्ती विधानसभेतच होणे आवश्यक

Omkar B

हिमालयातील मोटरस्पोर्ट इव्हेंटमध्ये गोव्याचा अमूल विजेता

Amit Kulkarni

पत्रादेवीत दहा लाखांची चोरटी दारु जप्त

Patil_p