Tarun Bharat

ढवळी येथे दिवाळी बाजाराचे उद्घाटन

प्रतिनिधी /फोंडा

ढवळी येथील गणेशोत्सव मंडळाच्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत करून करण्यात आले. यावेळी कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, उपसरपंच मनुजा नाईक, पंचसदस्य सोनाली तेंडुलकर, श्वेता गावडे, उषा नाईक, समीता नाईक, उद्योजक देवेंद्र ढवळीकर, मंडळाचे अध्यक्ष यतीन नाईक आदी व्यासपिठावर उपस्थीत होते.

 ढवळी गणेशोत्सव मंडळाच्या या दिवाळीच्या बाजारातील वस्तूंना आता ऑन लाईन मागणी येत आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तुंकडे पर्यटकही आकर्षित होताना दिसतात. राजसी देसाई ही कन्स्ट्रक्शन आस्थापनात संचालीका असून ऑन लाईन साडी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या साडय़ांना भारतातच नव्हे तर जगभरात मागणी असल्याचे पाहून आपल्या कन्येचे आपल्याला अप्रूप वाटते. सर्व गृहणींनी असाच ऑनलाईन व्यवसाय करण्याचे आवाहन आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.

 राजेश कवळेकर म्हणाले, ढवळीचा दिवाळीचा बाजार पारंपरिकता जपणारा आहे. विविध स्टॉल्स लावून छोटय़ा व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांच्या उद्यमशिलतेला वाव देतात. सरपंच म्हणून आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो. स्वागत वेंदागी ढवळीकर यांनी तर ऐश्वर्या जोशी यांनी आभार मानले.

स्वादिष्ट जिन्नस पुस्तकाचे प्रकाशन

 प्रज्वलीता गाडगीळ यांनी लिहिलेल्या ‘स्वादिष्ट जिन्नस’ या पुस्तकाचे सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. गाडगीळ यांचे हे पाचवे पुस्तक आहे. या पुस्तकात विविध जिन्नसांची माहिती दिली आहे. गोव्याच्या ग्रामीण भागातून तयार करण्यात येत असलेले जिन्नस आता युवा पिढीला ज्ञात होण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. दिवाळीच्या झगमगटात आपल्या या पुस्तकांचे प्रकाशन होणे ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे सौ. गाडगीळ यांनी सांगितले. यावेळी स्मीता पित्रे या उपस्थित होत्या.

 गाव्याची संस्कृती, पारंपरिकता व विविधता जपण्यासाठी अशी माहिती पुस्तकातू संग्रहीत करणे आवश्यक आहे. सौ. गाडगीळ यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे आमदार ढवळीकर यांनी सांगितले.

Related Stories

पणजीतील सर्व सरकारी, निमसरकारी इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा : वीजमंत्री

Amit Kulkarni

अर्थसंकल्पाचा गोव्याला मोठा लाभ

Amit Kulkarni

सिद्धेश नाईक बनले गोवा भाजपचे सचिव

Amit Kulkarni

अडकलेल्या मजुरांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी सरसावले रिव्होल्युशनरी इंडियन

Omkar B

फोंडय़ात ‘रायकर सेल्स’ सायकल आस्थापनाचे उद्घाटन

Amit Kulkarni

कवी बोरकर स्मारक प्रतिष्ठानतर्फे उद्या फोंडय़ात ‘कांचन संध्या’

Amit Kulkarni