Tarun Bharat

तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्थव्यस्थेला बळकटी देणार

सरकारकडून थिंक टॅंकवर काम सुरु : विविध क्षेत्रांवर विश्लेषण शक्मय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना विषाणूचा वाढता विळख्याने देशातील अर्थव्यवस्था प्रभावीत झाली आहे. याला बळकटी देण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ञांकडून यावर विचारविनियम सुरु असल्याची माहिती आहे. परंतु अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी आगामी काळात तंत्रज्ञानाचा सर्वतोपरी वापर करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी केंद्र सरकार एक विशिष्ट थिंकटँकच्या स्वरुपात नियोजन करत आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर सर्व प्रयत्न करुन अर्थव्यवस्था पहिल्यासारखी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

संशोधनावर भर

विविध पातळय़ावर संशोधन करुन त्यानंतर या योजनेची माहिती पंतप्रधान कार्यालय, निती आयोग आणि विज्ञान तसेच तंत्रज्ञान विभागालाही नव्या योजनेची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ही योजना पेपर सायन्स ऍण्ड टेक्नालॉजीच्या आधारे एक स्वायत संस्था टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन, फोरकास्टिंग ऍण्ड असेसमेंट काउंसिल(टीआयएफएसी) तयार करत आहे. 

सदर योजना तयार करणाऱया टीआयएफएसी प्रथम मेक इन इंडियाला मजबूत करणार आहे. देशातील व्यापारीकरण, तसेच त्यावर आधारीत असणारी प्रणाली विकसित करणार आहे. ग्रामीण क्षेत्रात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासोबत आयात कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

कृत्रिम बुद्धीमत्तेवर भर

या थिंकटँकच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर, मशीन प्रशिक्षण तसेच डाटा विश्लेषण सारख्या गोष्टीना महत्त्व देण्यात येणार असल्याचे टीआयएफएसीचे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

Related Stories

टाटा मोर्ट्सची 5 लाख कार्स विकण्याची योजना

Patil_p

सारेगामा इंडियाची 750 कोटीची गुंतवणूक

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 27 फेब्रुवारी 2021

Patil_p

एचडीएफसीकडून ऑनलाईन प्रॉपर्टी शो

Patil_p

सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

prashant_c

देशी ट्विटर म्हणून ओळख असणारे ‘कू’ ऍप आता स्थानिक भाषांमध्ये

Patil_p